आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:आपलं गाव आपले समजून काम केले‎; निरोप समारंभाप्रसंगी ठाणेदार सुनील अंबुलकर यांचे प्रतिपादन‎

जळगाव जामोद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गावात आल्यानंतर प्रथमच‎ वाहतुकीची शिस्त लावली. त्यावेळी ‎बळाचा वापर झाला आहे असेल‎ परंतु सर्व राजकीय पक्षाच्या व्यक्तींनी ‎ ‎ त्यांच्या पाठीराख्यांची समजूत काढून ‎ मला पाहिजे त्यावेळी सेवाभावी‎ व्यक्तीनी मदत केली व मी आपलं‎ गाव समजून काम केलं असेल‎ प्रतिपादन ठाणेदार सुनील अंबुलकर‎ यांनी निरोप समारंभात सत्काराला‎ उत्तर देताना केले.

येथील बुलडाणा‎ अर्बन सोसायटीच्या सभागृहात ३१‎ डिसेंबर रोजी झालेल्या निरोप‎ समारंभाचा कार्यक्रम पार पडला.‎ यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी‎ ओमप्रकाश आठवते होते तर‎ व्यासपीठावर वंचितचे रामकृष्ण‎ रजाने व्यापारी संघटनेचे अजय‎ वानखडे, बुलडाणा अर्बनचे‎ डॉ.किशोर केला, शिवसेनेचे भीमराव‎ पाटील, सुनिल भैया यांची उपस्थिती‎ होती.‎

याप्रसंगी ठाणेदार अंबुलकर यांचा‎ शाल,श्रीफळ, बुके व भेटवस्तू देऊन‎ सत्कार करण्यात आला. यावेळी‎ बजरंग दल प्रांत संयोजक अमोल‎ ‎ ‎ ‎अंधारे, गजानन धोरण, उद्धव सातव‎ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे‎ प्रास्ताविक भीमराव पाटील यांनी तर‎ संचालन मुख्याध्यापक उमाळे केले.‎ उपस्थितांचे आभार शाखा‎ व्यवस्थापक केला यांनी मांनले.‎ कार्यक्रम यशस्वीतेसाठी बुलडाणा‎ अर्बन परिवार व व्यापारी संघटनेने‎ परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...