आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सुशिक्षित बेरोजगार ‘अजय’ झाला आत्मनिर्भर; शासनाच्या परीक्षा देऊन थकलेल्या युवकाने निवडला रोजगाराचा मार्ग

पुसद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशिक्षित युवकाला शासकीय नोकरी मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करू लागतो. मात्र स्पर्धेच्या युगात व भ्रष्ट झालेल्या सरकारी यंत्रणा पुढे सुशिक्षित बेरोजगार हतबल होतो. शेवटी उदरनिर्वाहासाठी आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा व त्याच्या कुटुंबाच्या आधार बनण्यासाठी नोकरी न मिळाल्याने रोज मजुरी देखील करू लागतो. असाच एक तालुक्यातील हेगडी तांडा येथे राहणारा सुशिक्षित बेरोजगार युवक शासनाच्या नोकरीची वाट न पाहता स्वतःचा व त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

त्या सुशिक्षित बेरोजगार युवकाने चहाची टपरी टाकून उदरनिर्वाहाचा मार्ग मोकळा केला आहे. अजय रतन राठोड वय २८ वर्ष रा. हेगडी तांडा असे त्या सुशिक्षित बेरोजगार युवकाचे नाव आहे. त्याने येथील ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर चहाची टपरी टाकली आहे. अजयने नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील ड श्रेणीकरिता परीक्षा दिली आहे.

त्याने २०२० मध्ये बारावी परीक्षा उत्तीर्ण केली असून त्याचे पदवी शिक्षण देखील पूर्ण झाले आहे. तो गेल्या दोन वर्षापासून सरकारी नोकरीसाठी धडपड करीत आहे. त्याने महाराष्ट्र शासनाच्या अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या असून त्याला अजून कुठेही यश आले नाही. अजय राठोड सारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करीत आहे.

महाराष्ट्रात लाखो सुशिक्षित बेरोजगार युवकांचे वयोमर्यादा देखील संपलेली असून शासनाच्या नोकरीची आजही वाट पाहत आहेत. त्यासाठी कुटुंबांना सोडुन पुण्या, मुंबई सारख्या शहरात जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी देखील करतात. मात्र स्पर्धेच्या युगात व भ्रष्ट झालेल्या शासकीय खात्यातील बड्या बाबुंची खाऊगिरीमुळे स्पर्धा परीक्षेसाठी मेहनत करणाऱ्या युवकांना यश मिळत नाही. याचं अनेक उदाहरण महाराष्ट्रात गाजले देखील आहे. यात विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पद भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याच्या प्रकार उघडकीस आला होता.

बातम्या आणखी आहेत...