आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपास:सासुरवाडीला गेले आसतानाच; चार घरफोड्यांत पाच लाखांचा ऐवज लंपास

कळंब22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पिंपळगाव (रुईकर) येथे मंगळवार, दि. ७ जून च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ४ घरफोडी करुन सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम ४ लाख ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पिंपळगाव (रु.) येथील रंगराव चिमाजी घुले वय ३७ वर्ष कुटुंबासह घराला कुलूप लाऊन सावरगाव येथे सासुरवाडीला गेले होते. अशात बुधवार, दि. ८ जून रोजी पहाटेच्या सुमारास शेजाऱ्याला त्यांचे घर उघडले असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी घुले यांना दिली असता, त्यांनी लगेच घर गाठले.

त्यावेळी घरातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. यावेळी त्यांचा चांदीचा गोफ, सोन्याच्या बाळ्या किंमत अंदाजे ७ हजार ३०० रुपये, असा २ लाख ७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यांच्या घराशेजारी राहात असलेली शेतकरी महिला शेवंता बाई गोमाजी शिंगाडे वय ६० वर्ष ही गावातील मुलाचे घरी मुक्कामी गेली होती.

त्यावेळी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून ३५ ग्रॅम सोन्याची पोत किंमत अंदाजे एक लाख ४० हजार रुपये, बॅंकेचे पिक कर्ज उचललेली रोख रक्कम ५० हजार रुपये, असे एक लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्याच परिसरातील साहेबराव मारोती केसकर वय ४० वर्ष यांचे घर फोडून रोख रक्कम ५० हजार रुपये, तसेच त्यांचा शेजारील भाऊ विठोबा मारोती केसकर वय ६० वर्ष यांच्या घरातील रोख २५ हजार रुपये, असा एकुण ४ लाख ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. कळंब पोलिस स्टेशनला तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...