आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजलजीवन मिशन अंतर्गत वडगाव येथे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम नियम धाब्यावर बसवून ठेकेदार मनमर्जीने करत आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. सोबतच तीन फूट खोदण्याची परवानगी असताना एक फूट खोलीकरण केले जात आहे. या कामाची तक्रार रहिवासी अनिल शिंदे यांनी गटविकास अधिकारी संजय राठोड यांना यांच्याकडे दाखल केली आहे. तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या हद्दीतील जलजीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी शासनाने ५१ लाख ७३ हजार २११ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र एवढा मोठा निधी जिरवण्याचा प्रयत्न होत आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी सुरू असलेल्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे.
नियमानुसार तीन फूट खोल करून पाइपलाइन टाकण्याची मंजुरात मिळाली असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. परंतु वास्तविक त्या ठिकाणी कुठे एक फूट, तर कुठे दोन फूट खोलीकरण करून पाइपलाइन टाकली जात आहे. ठेकेदार मनमर्जीने खोदत असल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. ग्रामस्थांना पाणी पुरवठा नियमित व्हावा, यासाठी गावातीलच विहिरीवरून पाइपलाइन टाकण्यात येत आहे.
यात विशेष बाब म्हणजे गावातील त्याच विहिरीवरून पाइपलाइन टाकण्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यात आला होता. त्या वेळेसची कामेही थातूरमातूर दाखवून बिल काढले होते. त्याच विहिरीवरून पाइपलाइन टाकून यंदाही जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामस्थांना पाणी मिळावे म्हणून कामे चालू आहेत. परंतु त्या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले. यामुळे हे काम थांबवून चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.