आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलेट बाइकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करत फिरणारे दुचाकीस्वारांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात झाली आहे. हॉस्पिटल्स, शाळा, महाविद्यालये तसेच इतर शांत व सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण होते. शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे बुलेटवरून हवा करत फिरणाऱ्या अतिउत्साही युवकांची हवा काढण्याचे आव्हान शहर वाहतूक शाखेवर येवून ठेपले आहे.एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा आढळून आलेल्या बुलेट स्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याची तयारी सुध्दा पोलिसांनी केली आहे.
बुलेटची क्रेझ तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत असून दुचाकीचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे. मात्र, या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणाऱ्या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५० डेसिबल पर्यंत आवाज हा नियमात आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या बुलेटचा आवाज हा ८० ते ९० डेसिबल इतका असल्याने नियमाचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
यासाठी बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा केले जाणारे बदल कारणीभूत आहे. कर्णकर्कश आवाजामुळे एखादा वाहनचालक दचकून अपघाताची देखील शक्यता आहे. अशा बुलेट विरांच्या आवाजाला लगाम कोण लावणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे. बुलेटचे सायलेन्सर हा परिवहनाच्या नियमानुसार बसवलेला असतो. मात्र, काही ग्राहक वाहन विकत घेतल्यानंतर त्यात बदल करून घेतात. यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावरील रबर ट्रॅप बसविला जात आहे. त्यामुळे फटाक्यासारखा मोठा आवाज होतो.शहरातील प्रमुख रस्त्यांवर बुलेट चालक कर्णकर्कश भोंगे वाजवत वाहन चालवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नागरी वस्ती मधून बुलेट नेताना अनेक चालक मोठा आवाज करतात अशा बुलेट विरांवर कारवाईसाठी वाहतूक शाखा पुढाकार घेणार का, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
टार्गेट पूर्णत्वाकडे शहर वाहतूक शाखेचे लक्ष वर्षभर उभे राहून वाहतूक पोलिस चौकाची शोभा वाढवितात. वर्षांच्या शेवटी टार्गेट पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वरिष्ठांकडून दबावतंत्राचा वापर केल्यानंतर ऍक्टिव्ह मोडवर येतात. तद्नंतर कुठल्याही प्रकारे वाहनचालकांना दंडाच्या पावत्या माथी मारल्या जातात. शेवटी टार्गेट पूर्ण करून स्वत:ची पाठ थोपटविण्यात शहर वाहतूक शाखा धन्यता मानते.
तर वाहन परवाना रद्द शहरात फटाक्यासारखा मोठा आवाज करीत बुलेट चालवणाऱ्या चालकांवरकारवाई करण्यातयेत आहे. त्यासंदर्भात वाहतूकशाखेला सूचनादेण्यात आल्याआहे. एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा आढळून आलेल्या बुलेट स्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याची सुध्दा तयारी केली आहे. डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक,सर्व सामान्यांना प्रचंड त्रास शहरातील प्रमुख रस्त्यांवर बुलेट चालक कर्णकर्कश भोंगे वाजवत वाहन चालवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नागरी वस्ती मधून बुलेट नेताना अनेक चालक मोठा आवाज करतात. ह्या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
विक्रीवरच कारवाई का नाही? बुलेट व इतर गाड्यांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मात्र, अशा सायलेन्सरची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची आवश्यकता आहे. शहरात अशाप्रकारे सायलेन्सर बसवून देणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांकडून कायद्याचा भंग होत असून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीच आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
तर वाहन परवाना रद्द शहरात फटाक्यासारखा मोठा आवाज करीत बुलेट चालवणाऱ्या चालकांवरकारवाई करण्यातयेत आहे. त्यासंदर्भात वाहतूकशाखेला सूचनादेण्यात आल्याआहे. एकदा कारवाई केल्यानंतर पुन्हा आढळून आलेल्या बुलेट स्वाराचा वाहन परवाना रद्द करण्याची सुध्दा तयारी केली आहे. डॉ. पवन बन्सोड, पोलिस अधीक्षक,
सर्व सामान्यांना प्रचंड त्रास शहरातील प्रमुख रस्त्यांवर बुलेट चालक कर्णकर्कश भोंगे वाजवत वाहन चालवत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. नागरी वस्ती मधून बुलेट नेताना अनेक चालक मोठा आवाज करतात. ह्या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.