आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंपूर्ण महाराष्ट्रात लम्पी आजाराने थैमान घातलेले आहे. लम्पी हा विषाणुजन्य आजार असल्याने यावर कोणतीही उपचार देखील निघालेली नाही. अशा परिस्थितीमध्ये पुसद शहरात सर्रास उघड्यावर मांसाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुसद शहरात लम्पी आजाराने ग्रस्त असलेल्या जनावराची कत्तल होत असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. अशा परिस्थितीत नगरपालिकेसह पशू वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी देखील कारवाई करत नसल्याने मांसाहारींना आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वसंत नगर, खडसे मैदान, लोहार लाइन, गढी वॉर्ड, दिग्रस रोड, नूर कॉलनीसह श्रीरामपूरसह आदी भागात तर मोठ्या प्रमाणावर खुलेआम व दिवसभर प्राण्यांचे मांस विकल्या जात आहे.
त्यासोबतच वसंत नगरच्या गल्लो गल्लीत व शहरातील मुख्य मार्गावर खुलेआम प्राण्यांच्या मांसाची विक्री केली जात आहे. नगरपालिकेसह पशुसंवर्धन कार्यालयाकडे मोजक्याच परवानाधारकाची नोंद पिढ्यां पिढी चालत आलेली आहे. परंतु शहरांमध्ये परवानाधारक नसलेले ९० टक्के आहे. अशांनी प्राण्यांच्या मांस विक्रीचे दुकाने थाटलेली आहे. शहरात पावलोपावली मास विक्रीच्या दुकानाने परिसरात दुर्गंधी देखील पसरलेली आहे.
शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जामबाजार, बेलोरा इंदिरानगरसह शहरातील मुख्य ठिकाणी प्राण्यांची कत्तल करून वाहतूक केल्या जात आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. शहरातील लोहार लाईन व वसंत नगरमध्ये परवानाधारक नसलेले मोठ्या प्रमाणात प्राणंयांची कत्तल करून दिवसभर व खुलेआम मांसाची विक्री होत आहे. त्यामुळे लम्पी आजाराने एखाद्या मांस शौकीनाचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यावर प्रशासनाला जाग येईल की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परवानाधारक नसलेल्यावर व ज्यांच्याकडे परवाना आहे अश्या मांसविक्रेते कशा पद्धतीने जनावराची कत्तल करतात व त्यांना परवानगी कशा पद्धतीने दिली जाते हा देखील चौकशीचा विषय बनला आहे. नगरपालिका, पशुवैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी संयुक्त कारवाई करतात का? याकडे मांसाहारी शौकिनायसह नागरिकांची लक्ष लागलेली आहे.
एकाही मांस विक्रेत्याची नोंद नाही आमच्याकडे मोजकेच परवानाधारक जनावरांच्या कत्तलीसाठी मंजुरी घेतात. उर्वरित परवानगी घेत नाहीत. आमच्याकडे अधिकृत मांस विक्रेते परवानाधारकाची नोंद नाही. ती नगरपालिकेकडे असायला पाहिजे. आजारी जनावरांची कत्तल करून विकणे चुकीचे आहे. - डॉ. सुनील चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी, पुसद विनापरवाना मांस विक्रेत्यांवर होणार कारवाई नगर पालिकेच्या हद्दीत पिढ्यां पिढ्या चालत आलेल्या मांस विक्रेत्या परवाना धारकाची नोंद आहे. ज्यांच्याकडे परवाना नाही अशांना नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल. खुलेआम व परवानगी नसताना मांस विकणे हे गुन्हा आहे. - डॉ. किरण सुकलवाड, मुख्याधिकारी न.प. पुसद.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.