आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा आपल्या पत्नीचे बाहेरील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीला विहिरीत ढकलून जीवानिशी ठार केले. या घटनेने तालूका हादरला असून ही घटना गुरुवार, दि. २ मार्चला रात्री ८ वाजताच्या सुमारास तालुक्यातील शरद (ये ) येथे घडली. राहुल उद्धव मेश्राम वय ३२ वर्ष असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पूजा मेश्राम वय २५ वर्ष असे मृत पत्नीचे नाव आहे. कळंब तालुक्यातील शरद येथे राहुल मेश्राम हा आपल्या शरद शिवारातील शेतात पत्नी व दोन अपत्यासह राहत होता. पत्नी पूजा हिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याच्यात अनेकदा खटके उडायचे. अश्यातच दि. २ मार्चला सायंकाळी त्यांच्यात याच कारणातून कडाक्याचे भांडण झाले.
यावेळी राहुल याने पूजाचा काटा काढण्याचा बेत आखला. पिण्याचे पाणी आणन्याच्या बहान्यातून राहुल याने पूजाला विहिरीवर नेले. व आजुबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत ढकलून दिले. त्यात काही वेळातच तिचा मृत्यू झाला. दोन दिवसानंतर शव विहिरीत तरंगू लागल्याने ही घटना उघडकीस आली. घटनेनंतर मृत पूजा हिचे वडील जगदीश गजभिये यांच्या तक्रारीवरून राहुल मेश्राम याच्याविरोधात गुन्हा नोंद करून पोलिसांनी अटक केली. या घटनेने मृताच्या दोन सहा वर्षीय अपत्यांचा जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.