आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याला मोठा फटका:रानडुकरांनी सोयाबीन पिकाची लावली वाट ; शेतकरी हवालदिल

मानोरा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सावरगाव कान्होबा या गावातील शेतकरी वन्य प्राण्यांच्या रात्रंदिवसाच्या त्रासामुळे मेटाकूटीस आलेले असून काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेत शिवारात रानडुकरांनी मोठ मोठाले खड्डे घालून शेतकऱ्याला मोठा फटका दिला आहे.सावरगाव कान्होबा, खापरी कान्होबा, खापरदरी, वार्डा, गिर्डा, सनगाव, हिवरा, इंगलवाडी, मेंद्रा, वटफळ या व तालुक्यातील इतरही गावातील हजारो शेतकऱ्यांची शेती वन्य प्राण्यांच्या खरीप आणि रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकावरील आक्रमणामुळे धोक्यात आलेली आहे.

दिवसा शेतीतील कामानिमित्याने शेतकरी शेत शिवारात हजर असतो तर कडक उन्हाळा असो जीवघेणी थंडी असो वा धो-धो पडणारा पाऊस रात्री जीव धोक्यात घालून वन्य प्राण्यांनी शेतीचे उलंगवाडी करू नये म्हणून रात्री जागल करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत जीव डोक्यात घालून जावेच लागते. मदनसिंग काळूसिंग राठोड ह्या शेतीवर कुटुंबाची गुजरान करणाऱ्या शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकात रानडुकराच्या कळपांनी मोठमोठाली खड्डे खणून काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले आहे. अशीच परिस्थिती सावरगाव कान्होबा आणि इतरही गावातील शेतकऱ्यांची आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यात येण्याची मागणी बाधित शेतकरी राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...