आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजी महोत्सव:जागतिक आदिवासी दिन सप्ताहांतर्गत मोताळयामध्ये रान भाजी महोत्सव

मोताळा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आदिवासी दिन सप्ताहतंर्गत येथील पंचायत समितीच्या आवारात कृषी विभागाच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी रान भाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रामराम यांच्या हस्ते करण्यात आले. या रान भाजी महोत्सवात करुटले, दोडीचे फुल, अंबाडीची भाजी, अळूची पाने, शेरण्या, फांजीची भाजी, चवळीची फुले, बेलफळ आदी रान भाज्या ठेवण्यात आल्या होत्या.

या महोत्सवाला जयपूरचे सरपंच विक्रम देशमुख, पंचायत समितीचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट दिली. शहरातील अनेक नागरिकांनी या महोत्सवातून रान भाज्या खरेदी केल्या होत्या. यावेळी अधिकाऱ्यांनी निरोगी आरोग्यासाठी रान भाजीचे आहारातील महत्व व त्या आरोग्यासाठी कशा लाभदायक आहेत, हे उपस्थितांना समजावून सांगितले. या महोत्सवाचे नियोजन आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिनेश चित्रंग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रान भाजी महोत्सव कार्यक्रमाला शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...