आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सखोल चौकशी करण्याची मागणी:वसंत मधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे करणार; आमदार नामदेव ससाने यांची पत्रकार परिषदेत माहिती

उमरखेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंद अवस्थेत असलेल्या ‘वसंत’ सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ व कार्यकारी संचालकाच्या गैरकारभाराची व आर्थिक अफरातफरीची थांबलेली चौकशी ही दप्तर दिरंगाईमुळे लांबणीवर पडलेली कलम ८३ अंतर्गत सखोल चौकशी करण्याची मागणी लवकरच मुख्यमंत्र्याकडे करणार असून दोषी असणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे आमदार नामदेव ससाने यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.

पुढे बोलतांना आमदार नामदेव ससाने म्हणाले की, मागील ३ वर्षापासून वसंत बंद पडल्याने परिसरातील कास्तकारावर शोककळा पसरली होती. कारखाना सुरु व्हावा, यासाठी सर्व राजकीय मतभेद विसरून माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजयराव खडसे यांनी आटोकाट प्रयत्न केले. त्याच धर्तीवर आम्ही शेतकरी हितासाठी प्रयत्न केला. याही वेळेस सर्व राजकीय नेते मंडळी यांना सोबत घेतले. कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या न्यायालयातील याचिकेत त्यांनी हरकत घेतली नसल्याने न्यायालयाने आदेश पारित करित कारखाना सुरु होण्यासाठी हिरवी झेंडी दिली. त्यामुळे येणाऱ्या सिझनमध्ये कारखाना सुरु झाला पाहिजे तसेच पुढील वर्षी ४ लाख मेट्रिक टन गाळप होण्यासाठी कारखाना कुणीही घेवो त्यांना तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक, राजकीय पुढारी, समाजसेवक यांनी मदत केली पाहिजे असे आवाहन करीत, तरच कारखान्याचे गतवैभव प्राप्त होणार असल्याचे यावेळी आमदार ससाने यांनी सांगीतले. या पत्र परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष नितिन भुतडा, ज्येष्ठ पदाधिकारी दत्तदिगंबर वानखेडे, बळवंत नाईक, अजय बेदरकर, बालाजी वानखेडे खरुसकर, योगेश वाजपेयी आदी उपस्थित होते.

ईडी कडे लवकरच प्रकरण सादर करणार
कारखाना १५ वर्षासाठी भाडे तत्वावर जाणार ही बाब तालुक्यासाठीच नव्हे तर ऊस उत्पादक असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ५ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. मात्र या कारखान्यावर भ्रष्टाचार करून वाळवी लावुन ओस पाडणाऱ्या पापी तत्कालीन संचालक मंडळाची विनाविलंब ‘ईडी’ विभागाकडे लवकरच प्रकरण सादर करणार.
नितिन भुतडा, भाजपा जिल्हाध्यक्ष.

बातम्या आणखी आहेत...