आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पतसंस्थांच्या निवडणुका:निवडणुका सह. पतसंस्थांच्या, मात्र शिक्षक झाले बिझी; बहुतांश शाळांची साफसफाई नाही, अन्य कामेही वाऱ्यावर

यवतमाळ8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन वर्ष कोविड संसर्गमामुळे प्राथमिक शाळांचे वर्ग भरलेच नाही. यंदा मात्र, शैक्षणिक वर्ष नियोजित वेळेत चालू होणार आहे. असे असताना प्राथमिक, खासगी आणि माध्यमिकचे शिक्षक पतसंस्थांच्या निवडणुकीत ‘बीझी’ असल्याचे चित्र आहे. या धामधुमीत शाळांची साफसफाई करण्यापासून पाठ्यपुस्तके वितरणाची तयारी, पटसंख्या वाढीकडे यंदा शिक्षकांनी पूर्णता: दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक ३ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीत सध्या दोनशेहून अधिक उमेदवार भाग्य आजमावत आहे. सोमवार, २१ जून रोजी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तद्नंतर अंतीम यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. या पतसंस्थेच्या निवडणूक रिंगणात सर्वाधिक शिक्षकच भाग्य आजमावत आहे.

त्याचप्रमाणे शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था माध्यमिक विभाग ह्या पतसंस्थेची निवडणूक १० जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आघाडीवर आहेत. एकंदरीत दोन्ही पतसंस्थांच्या निवडणुकीत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात ‘बिझी’ झालेले आहे. अवघ्या दहा दिवसानंतर शैक्षणिक वर्षांला सुरूवात होणार आहे. या शाळांची साफसफाई करण्याचे निर्देश प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभागाने दिले असून, शाळा उघडण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाय योजना करण्याबाबतही अवगत केले होते.

मात्र, बहुतांश शाळेतील शिक्षकांनी साफ-सफाईकडे पूर्णता: दुर्लक्ष केले आहे. आतातरी निवडणुकीच्या प्रचारात शिक्षक असल्यामुळे ही साफसफाई होणे अवघड आहे. प्रचाराच्या दृष्टीने बहुतांश शिक्षकांनी मतदानाच्या दिवसांपर्यंत बुट्ट्या टाकल्या आहेत. आता बुट्ट्या असल्यामुळे शिक्षक शाळेत येणार नाही, तोपर्यंत शाळेची अवस्था जैसे थे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करावयाचे आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत यासह इतरही बाबींसाठी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागेल.

पाठ्यपुस्तक वाटपाची होणार वांदेवाडी
मार्च महिन्यात ई-बालभारती पोर्टलवर सर्वशिक्षाने १३ लाख ७१ हजार ७५२ पुस्तकांची नोंदणी केली होती. नोंदणीनुसार अमरावती बालभारती डेपोत दाखल झालेली पाठ्यपुस्तके जिल्ह्यातील सोळाही तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवण्यात आली आहे. तर अर्ध्याहून अधिक शाळेत पाठ्यपुस्तके पोहोचलीच नाही. परिणामी, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

स्वयं अध्ययन केंद्र नावालाच
दोन सत्रापासून कोरोना महामारीमुळेप्रत्यक्षात शाळा सुरू होवू शकल्या नव्हत्या. मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याच्या दृष्टीने उन्हाळ्याच्या सुट्यांत स्वयं अध्ययन केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार बोटावर मोजण्या इतक्याच शाळेत केंद्र चालु झाले होते. विशेष म्हणजे याचे नियमित फोटो पाठवण्याचे सुचवले होते, परंतू काही पंचायत समितीतील शाळांनी ह्याची अंमलबजावणी केली. मात्र उर्वरीत शाळांनी त्याकेड दुर्लक्ष केले.

शिक्षकांसाठी भरवणार प्रेरणा कार्यशाळा
जि.प., न. पा.च्या शिक्षकांसाठी प्रेरणा कार्यशाळा भरवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. ही कार्यशाळा २२ ते २५ जून दरम्यान भरवण्यात येणार असून, दैनंदिन दोन सत्रात घेतल्या जाणार आहे. प्रत्येक शिक्षकाला ह्या कार्यशाळेत हजर राहावेच लागणार आहे. निवडणुकांमध्ये शिक्षकच अग्रेसर आहेत, परंतू शंभर टक्के बुट्ट्या शिक्षकांना दिल्या जाणार नाही.
- प्रमोद सुर्यवंशी, प्राथमिक शिक्षणाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...