आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:खरीप हंगाम तोंडावर तरीही ‘डीएपी, युरिया’साठी कंपन्यांची चालढकल; कोरोमंडळ कंपनीला बजावण्यात आली कारणे दाखवा नोटीस

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांच्या मशागती आटोपल्या असून, आता बि-बियाणे, खते, युरिया आदींच्या खरेदीसाठी शेतकरी सज्ज झाले आहेत. मात्र, नामांकीत कंपन्या डीएपी, युरिया उपलब्ध करून देण्यास निरुत्साह दर्शवत आहेत. यापूर्वीच बफर्स स्टॉक उपलब्ध करून न दिल्याने दोन कंपन्यांना नोटीस बजावली होती. आता पुन्हा युरिया, डिएपीसाठी चालढकल केल्यामुळे कोरोमंडळ कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सायंकाळी नोटीस बजावण्यात आली आहे.

जिल्ह्यात ९ लाख हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होते. त्यात यंदाही सर्वाधिक पेरा कापूस, सोयाबीनचा होणार आहे. त्या अनुषंगाने आवश्यक असलेले बि-बीयाणे, खते, किटकनाशक, युरिया, डिएपी आदींची मागणी कंपन्यांकडे प्रस्तावित करण्यात आली आहे.

कंपन्यांनी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत बफर्स स्टॉक उपलब्ध करून देण्याची संमती दर्शवली होती. मात्र, काही कंपन्यांनी बफर्स स्टॉक उपलब्ध करून देण्यात चालढकल केली. शेवटी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी चंबल, कृभको कंपनीच्या क्षेत्रीय व्यवस्थापकांना नोटीस बजावली होती. यानंतर कंपन्यांनी बफर्स स्टॉक उपलब्ध करून दिला, परंत आता नियमित मागणीला सुद्धा कंपन्या प्रतिसाद देत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. युरिया, डिएपीची कमतरता पडू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियमित बैठकांचे सत्र चालू आहे. कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येत आहे.

तरीसुद्धा ह्याकडे काही नामांकीत कंपन्यांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी, प्रशासनाने आता कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहे. अशात कोरोमंडळ कंपनीकडे दोन हजार मेट्रिक टन युरिया आणि एक हजार १०० मेट्रिक टन युरियाची डिमांड करण्यात आली आहे, परंतू कंपनीने अद्यापही युरिया, डिएपी उपलब्ध करून दिलेच नाही. वारंवार दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंपनीला शोकॉज नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते .

यासोबत आरसीएफ, स्टीक, इफ्को, प्रोक्टो, आरएफसीएल, एनएफसीएल, एनएफएल, आदी कंपन्यांचा समावेश आहे. अवघ्या महिन्याभरानंतर मृग नक्षत्र लागणार आहे. पाऊससुद्धा समाधानकारक असल्यामुळे शेतकरी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर लागवड करण्याची शक्यता आहे. धूळपेरणी होवू नये म्हणून कृषी विभागाने जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बि- बीयाणे, खते विक्रीबाबत कृषी केंद्र चालकांना अवगत केलेले आहे. तत्पूर्वी कंपन्यांनी बि-बीयाणे, खते, युरिया, डिएपी उपलब्ध करणे गरजेचे आहे. अन्यथा कृत्रिम तुटवडा निर्माण होईल.

बातम्या आणखी आहेत...