आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोजगार:मानधन अडवणे बेचखेडा सरपंचाच्या येणार अंगलट ; रोजगार सेवकाचे मानधन, तीनवेळा दिला अर्ज

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेचखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने ग्रामरोजगार सेवकाचे मानधन अडविले. या प्रकरणी तीनवेळा पत्रव्यवहार केला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासमक्ष सुनावणी सुद्धा पार पडली. तरी मानधन अदा करण्यात आले नाही. आता सरपंचावर कारवाईची टांगती तलवार ओढावली असून, आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तालुक्यातील बेचखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच यांनी ग्राम रोजगार सेवकाचे मानधन अडवले होते. या प्रकारामुळे संतापलेल्या ग्राम रोजगार सेवकाने १० जानेवारी २०२२ रोजी अर्ज दाखल केला होता. तद्नंतर तीनवेळा पत्रव्यवहार केला. या प्रकरणी केलेल्या चौकशीत सरपंच दोषी आढळून आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सुनावणी घेण्यात आली. दरम्यान, सरपंचाना नोटीस बजावून मानधन अदा करण्याबाबत आदेशित केले होते. शेवटी अरविंद गुडधे यांनी कारवाईच्या परवानगीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही केल्या जाणार आहे.

चौकशीमध्ये सरपंच दोषी आढळले ^बेचखेडा येथील ग्राम रोजगार सेवकाचे मानधन सरपंचाने अडवले आहे. या प्रकरणाच्या तक्रारीनंतर चौकशी केली. चौकशीत ते दोषी आढळून आले होते. त्यावरून त्यांना त्वरीत मानधन अदा करावे, असे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन दिले होते. तरीसुद्धा मानधन अदा केलेच नाही. शेवटी आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...