आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना करण्याची मागणी:चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला गतप्राण ; वाघाच्या हल्ल्यामध्ये 50 वा मृत्यू

गडचिरोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील रुद्रापूर येथे बुधवारी एका शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतर गुरुवारीही सावलीपासून ३ किमी अंतरावरील खेडी येथे शेतात कापूस काढत असताना वाघाने हल्ला करून स्वरूपा प्रशांत येलेटीवार (५०) यांना ठार केले आहे. गेल्या आठ दिवसात सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यातील हा गेल्या वर्षभरातील ५० वा मृत्यू आहे.

आठवडाभरापूर्वी सावलीपासून ५ किमी अंतरावरील रुद्रापूर येथील शेतकरी बाबुराव बुद्धाजी कांबळे वय ६५ वर्ष हे रोजप्रमाणे १४ डिसेंबर रोजी आपल्या शेताकडे निघाले असता वाटेत दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांच्या मानेला पकडून जंगलात घेऊन गेला. गुरुवारी, १५ डिसेंबर रोजी खेडी येथे स्‍वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यू झाला. त्‍याआधी ७ डिसेंबर रोजी पेटगाव येथील कैलास लक्ष्मणराव गेडेकर वय ४७ यांचादेखील वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या वर्षभरात वाघाच्या हल्ल्यात ५० जणांचा बळी गेला असून यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...