आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:महिलेचा विवस्त्र मृतदेह सापडला; पांढरकवडा तालुक्यातील मांजरी जंगलात घटना

यवतमाळ21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार, दि. १० जूनला सायंकाळच्या सुमारास पांढरकवडा तालुक्यातील मांजरी जंगल शिवारात उघडकीस आली. कावेरी उर्फ कविता जलपत तोडसाम वय ३५ वर्ष रा. कारेगाव बंडल असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव बंडल येथील महिला कावेरी तोडसाम ही दि. ८ जूनला सकाळी पांढरकवडा येथे रूग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाईकांला भेटण्यासाठी गेली होती. त्यानंतर ती परत येण्याकरीता पांढरकवडा बसस्थानकावर आली. मात्र उशिवरापर्यंत घरी पोहचली नाही. त्यामूळे कुटूंबीयात खळबळ उडाली. दरम्यान कुटूंबीयांनी तीचा सर्वत्र शोध सुरू केला, परंतू ती कुठेच आढळून आली नाही.

अखेर नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी पांढरकवडा पोलिस ठाणे गाठून हरविल्याची तक्रार नोंद केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. अश्यात सायंकाळच्या सुमारास त्या महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मांजरी जंगल शिवारात आढळून आला. यावेळी पोलिसांनी पाहाणी केली असता, तिच्या पोटावर आणि गळ्याभोवती जखमा आढळून आल्या. या प्रकरणी करण मरापे यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविराधोत विविध कलमान्वये विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. पुढील तपास पांढरकवडा पोलिस करीत आहे.

संशयित मारेकरी पोलिसांच्या जाळ्यात
पांढरकवडा तालुक्यातील कारेगाव बंडल येथील कावेरी उर्फ कविता तोडसाम या ३५ वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत शुक्रवार पांढरकवडा तालुक्यातील मांजरी जंगल शिवारात मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करीत एका संशयीताला ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...