आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्विनी महिला संस्था:यशस्वीनी संघटनेच्या वतीने महिलांचा सत्कार‎

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे यशस्विनी महिला संस्था, ओबीसी व‎ कुणबी महिला संघटनेच्या वतीने सामाजिक व शैक्षणिक‎ क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात‎ आला. किशोरी चौधरी, साधना चौधरी व प्रतिभा‎ सोनटक्के यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात‎ आला. याचवेळी मुलींची वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली.‎ तसेच महिलांसाठी विविध गेमचे आयोजन करण्यात‎ आले.

यशस्विनी व ओबीसी महिला संघटनेच्या अध्यक्षा‎ संगीता भुरे, मेघा गोमेकर, माधुरी चौधरी, स्मिता भोयर,‎ माया ठाकरे, शालीनी बेले, आदिती भुरे यांनी मनोगत‎ व्यक्त केले. संचलन कविता इंगोले यांनी तर आभार‎ कृपाली चौधरी यांनी व्यक्त केले. यशस्विते साठी‎ संघटनेच्या सर्व महिला सदस्यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...