आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:महिलांना सर्वांगीण विकासाची‎ संधी संविधानामुळेच मिळाली‎ ; प्रा. अनिल काळबांडे यांचे प्रतिपादन‎

ढाणकी‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या देशात सर्वप्रथम पुरुषाबरोबर‎ स्त्रियांना अधिकार डॉ. बाबासाहेब ‎ ‎ आंबेडकर लिखित संविधानामुळेच ‎ ‎ मिळाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्वच ‎ ‎ क्षेत्रात महिलांना संधी मिळाल्याने‎ केवळ या संविधानामुळेच महिलांची ‎ ‎ प्रगती झाल्याचे प्रतिपादन डॉ. अनिल ‎ ‎ काळबांडे यांनी केले. उमरखेड ‎ ‎ तालुक्यातील करंजी येथे जागतिक ‎ ‎ महिला दिनाचे औचित्य साधून‎ आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते‎ म्हणून बोलत होते.‎ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ माधवराव पाटील कलाणे, तर‎ उद्घाटक प्रा. मोहन मोरे, साहित्यिक‎ प्रा. अनिल काळबांडे, पोलिस‎ निरीक्षक प्रताप भोस, चिमणाजी‎ काळबांडे, अनिल पाटील कांबळे,‎ परमेश्वर रावते, महेश रावते, विक्रांत‎ रावते, बालाजी शिंदे, अमोल रावते,‎ वाघमारे, सुधाकर कांबळे, संभाजी‎ ‎हापसे, निवृती काळबांडे, प्रल्हाद‎ काळबांडे, राहुल काळबांडे, सिद्धार्थ‎ दिवेकर, हर्षद काळबांडे उपस्थित‎ होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या‎ म्हणून सरोज देशमुख यांनी १७५‎ वर्षापूर्वी जोतिबाच्या सावित्रीने‎ अथक परिश्रमाने स्त्री शिक्षणाची दारे‎ खुली करून शिक्षणाचा पाया रचला.‎ दुर्देवाने त्या सावित्रीबाई कितपत‎ समजल्या हा मोठा प्रश्न आहे.

परंतु‎ अनेक कर्तृत्ववान महिलांनी प्रत्येक‎ ‎ क्षेत्रात भरारी घेत क्षमता सिद्ध केल्या.‎ याचे कारण म्हणजे घटनेचे‎ शिल्पकार डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकरांनी महिला,पुरुष समसमान‎ समताधिष्ठीत व्यवस्था संविधानात‎ नमुद केली. स्त्री जातीवर होणारे‎ अन्याय, अत्याचाराला प्रतिबंध‎ घालण्यासाठी भारतीय संविधान‎ वरदान ठरले असे सांगितले. या‎ कार्यक्रमात तालुक्यातील‎ उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या‎ कर्तबगार महिलांचा सन्मानपत्र देऊन‎ सत्कार करण्यात आला. या‎ कार्यक्रमात प्रा. मोहनराव मोरे म्हणाले‎ की, स्त्रियांनी ७५ वर्षात केलेली‎ प्रत्येक क्षेत्रातील कामगिरी ही‎ लक्षवेधी असून, त्यांच्या पंखात या‎ उत्तुंग भरारी घेण्यासाठी माता रमाई,‎ माँ जिजाऊ, सावित्रीबाई फुलेंचा‎ त्याग व डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकरांच्या संविधानाचे बळ‎ आहे.

कार्यक्रमासाठी आनंद बौद्ध‎ विहार देखरेख समितीचे अध्यक्ष‎ संजय घुगरे, उपाध्यक्ष लक्ष्मण घुगरे,‎ रमेश घुगरे, प्रल्हाद घुगरे, प्रवक्ता‎ भीमराव हापसे, मसाजी भालेराव,‎ सरपंच शुद्धोधन घुगरे, ग्रा. पं. सदस्य‎ अरुण घुगरे, रोजगार सेवक दीपक‎ घुगरे, मारोती काकडे, अश्विनी घुगरे,‎ सुमेध घुगरे, बापुराव वाढवे, आशा‎ घुगरे यांनी सहकार्य केले.‎ सूत्रसंचालन रमेश घुगरे यांनी केले,‎ तर आभार भीमराव हापसे यांनी‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...