आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलूप:पाण्यासाठी चिखली रणथमच्या महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप ; निषेध व्यक्त केल्याची घटना

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहा ते बारा दिवस गावांत पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांसह सरपंचाच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत आपला निषेध व्यक्त केल्याची घटना चिखली रणथम येथे घडली. तालुक्यातील चिखली रणथम येथील पाणी पुरवठा गेल्या अनेक महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. दुधलगाव येथील विहिरीवरून चिखली रणथम येथे पाणी पुरवठा करण्यात येतो. उन्हाळ्यात या विहिरीचे पाणी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र विहीर अधिग्रहीत करण्यात येते. मात्र, यावर्षी गेल्या सहा महिन्यापासून हा पाणी पुरवठा विस्कळीत असून यामुळे गावातील नागरिकांमध्ये ग्राम पंचायत विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. दरम्यान ५ जून रोजी उपसरपंच विलास लहानू बोदडे, ग्राम पंचायत सदस्या गीता देवराज मेहंगे, देवराज मेहंगे यांच्यासह गावातील अनेक महिलांनी सरपंचाचे घर गाठत त्यांना पाणी पुरवठ्याबाबत विचारणा केली असता सरपंच पती व गावकऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी यावेळी संतप्त नागरिक व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त करत लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी केली. यावेळी उपसरपंच विलास बोदडेसह सदस्या गीता मेहंगे, देवराज मेहंगे, सलमा इंगळे, रता गोरे, मंगला येमनेरे, आशा गोरे, जनाबाई बोदडे, वाघे, वनमाला मेहंगे, सुशीला बिटे, अर्चना किन्हीकर, वंदना मेहगे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...