आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला दिन हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. पोलिस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेच्या वतीने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी विशेष शाखेतील महिला कर्मचाऱ्यांनी रंगीबेरंगी फेटे परिधान केले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा विशेष शाखेतील पोलिस निरीक्षक प्रशांत मसराम, सपोनि श्रीकांत इंगोले, पोलिस उपनिरीक्षक सुभाष वंजारी, रामभाऊ चंदनखेडे, कर्मचारी सुधाकर मेश्राम व इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात महिला कर्मचारी रूपाली मेने, ममता ठाकरे, प्रीती गेडाम, भारती जगताप, कविता भगत, जयश्री जरांडे, रोहिणी पाटील, सुलोचना राठोड, सोनू मोहाडे, अपेक्षा पाटनकर, मीनाक्षी फुसे आदींचा सन्मान करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.