आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ग्रामीण भागातील रोजगाराचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्यांसाठी ५ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अद्यापपर्यंत प्रशासनाने या कामबंद आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे पं.स. स्तरावर रोजगार हमी योजनेचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५ पासून लागू झाल्यानंतर गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात ग्रामरोजगार सेवकांची नियुक्ती करण्यात आली. या ग्रामरोजगार सेवकांना मिळणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर आजही काम करावे लागत असल्याने ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या संघटनेमार्फत संबंधित विभागास पत्र देऊनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसून सुरुवात केली आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर विविध कामे प्रलंबित आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांला मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तसेच रोहयोचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले आहे. त्यामुळे रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून त्यांना निश्चित मानधन देण्यात यावे, हे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे, वयोवृद्ध ग्रामरोजगार सेवकाच्या जागेवर त्याच्या कुटुंबातील सदस्याला घेण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले. रोजगार सेवक संघटना प्रलंबित मागण्यासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक देणार असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद जाधव यांनी सांगितले
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.