आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रोजगार सेवकांचे काम बंद आंदोलन ; निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला इशारा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून त्यांना विमा कवच लागू करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारपासून ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.रोजगार सेवकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अन्यथा कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. परंतु त्यावर प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करून त्यांना निश्चित मानधन देण्यात यावे, हे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात यावे, वयोवृद्ध ग्रामरोजगार सेवकांच्या जागेवर त्याच्या कुटुंबातील सदस्याला घेण्यात यावे, यासह इतर मागण्यासाठी काम बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद जाधव, उपाध्यक्ष प्रकाश व्यवहारे, सचिव राजू वगारहांडे, संदिप भरबडे, किशोर फुलजेले, महेंद्र अगलधरे, विष्णु बोढाले यांच्यासह रोजगार सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...