आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:निर्भय जीवनासाठी घेतली कार्यशाळा ; संकल्प फाउंडेशन, निर्भया व दामिनी पथकाचा उपक्रम

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक जगदंबा गर्ल्स हॉस्टेल मध्ये संकल्प फाउंडेशनच्या वनिता वाहिनी, निर्भया व दामिनी पथक व जगदंबा गर्ल्स हॉस्टेलच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.३० मे रोजी विद्यार्थिनी व महिलांनी जीवन जगतांना निर्भय होऊन सुरक्षित जीवन कसे जगावे ह्या करिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला सेल व दामिनी पथक प्रमुख एपीआय विजया पंधरे, प्रा. आशिष महल्ले, संकल्प महिला प्रमुख अंजली फेंडर, सीमा सोळंके उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना महिलांनी समाजातील मानसिक प्रवृत्ती ला ओळखून तत्काळ त्यासंदर्भातली माहिती निर्भया व दामिनी पथकाला देण्याचे आवाहन एपीआय पंधरे यांनी केले. तर आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या मनगटात तयार करून स्वत:ला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत आशिष वासुदेव महल्ले यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनींनी आद्य शिक्षिका क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत शिक्षणाच्या माध्यमातुन लढवय्या नेतृत्व विकसित करून समाजातील घातक प्रवृत्तीला संपुष्टात आणण्याचे आवाहन अंजली फेंडर यांनी केले. या वेळेस कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी स्नेहल भुमर तर आभार विद्यार्थीनी योगेश्वरी राठोड नी मानले. कार्यशाळेला जगदंबा इंजिनिअरिंग व फार्मसी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सोबत संकल्प फाउंडेशन आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत बोराडे, दामिनी पथकाच्या देवगडकर, मलनस, पवन तेलेवार आदी उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी बालाजी गरुडकर, व्यवस्थापक जगदंबा गर्ल्स हॉस्टेल व श्रुती पवार गर्ल्स प्रतिनिधी जगदंबा गर्ल्स हॉस्टेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

निर्भय जीवनासाठी घेतली कार्यशाळा

}संकल्प फाउंडेशन, निर्भया व दामिनी पथकाचा उपक्रम

प्रतिनिधी | यवतमाळ स्थानिक जगदंबा गर्ल्स हॉस्टेल मध्ये संकल्प फाउंडेशनच्या वनिता वाहिनी, निर्भया व दामिनी पथक व जगदंबा गर्ल्स हॉस्टेलच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि.३० मे रोजी विद्यार्थिनी व महिलांनी जीवन जगतांना निर्भय होऊन सुरक्षित जीवन कसे जगावे ह्या करिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळेस कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महिला सेल व दामिनी पथक प्रमुख एपीआय विजया पंधरे, प्रा. आशिष महल्ले, संकल्प महिला प्रमुख अंजली फेंडर, सीमा सोळंके उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करतांना महिलांनी समाजातील मानसिक प्रवृत्ती ला ओळखून तत्काळ त्यासंदर्भातली माहिती निर्भया व दामिनी पथकाला देण्याचे आवाहन एपीआय पंधरे यांनी केले. तर आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या मनगटात तयार करून स्वत:ला स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे मत आशिष वासुदेव महल्ले यांनी व्यक्त केले. विद्यार्थिनींनी आद्य शिक्षिका क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेत शिक्षणाच्या माध्यमातुन लढवय्या नेतृत्व विकसित करून समाजातील घातक प्रवृत्तीला संपुष्टात आणण्याचे आवाहन अंजली फेंडर यांनी केले. या वेळेस कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थीनी स्नेहल भुमर तर आभार विद्यार्थीनी योगेश्वरी राठोड नी मानले. कार्यशाळेला जगदंबा इंजिनिअरिंग व फार्मसी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सोबत संकल्प फाउंडेशन आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत बोराडे, दामिनी पथकाच्या देवगडकर, मलनस, पवन तेलेवार आदी उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी बालाजी गरुडकर, व्यवस्थापक जगदंबा गर्ल्स हॉस्टेल व श्रुती पवार गर्ल्स प्रतिनिधी जगदंबा गर्ल्स हॉस्टेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...