आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा‎:सामाजिक समता पर्वानिमित्त‎ युवा गटांची कार्यशाळा‎

वाशीम‎ ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय‎ व विशेष सहाय विभागांतर्गत‎ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,‎ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी‎ समिती व जिल्हा समाज कल्याण‎ अधिकारी जिल्हा परिषद, वाशीम‎ यांच्या संयुक्त वतीने सामाजिक‎ समता पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर सामाजिक न्याय भवन‎ येथे जिल्हास्तरावर युवा गटांची‎ कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.‎ अध्यक्षस्थानी जिल्हा कौशल्य‎ विकास व रोजगार विभागाच्या‎ सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज‎ होत्या. कार्यशाळेचे उद्घाटन‎ समाज कल्याणचे सहाय्यक‎ आयुक्त मारोती वाठ यांनी केले.‎ प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा जात‎ प्रमाणपत्र पडताळणी समितीचे‎ अध्यक्ष एल.बी.राऊत, जिल्हा‎ उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक‎ खंबायत, प्रकल्प अधिकारी रोकडे,‎ बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत‎ गव्हाळे यांची उपस्थिती होती.‎ वाठ यांनी सामाजिक न्याय पर्व‎ कार्यक्रमाच्या अनुषंगाने‎ जिल्हास्तरावर युवा गटाच्या‎ कार्यशाळेबाबत मार्गदर्शन केले.

या‎ कार्यशाळेमुळे युवकांना उद्योग‎ करण्याची दिशा मिळेल असे ते‎ म्हणाले.‎ गव्हाळे यांनी जिल्हास्तरावर युवा‎ गटाच्या कार्यशाळेची रुपरेषा विशद‎ केली. सामाजिक न्याय पर्वामध्ये‎ युवा गटांना प्रशिक्षण दिल्याचे‎ सांगितले. जिल्ह्यामध्ये 178 युवा‎ गट स्थापन करुन त्यांना‎ प्रशिक्षणासोबत रोजगार उपलब्ध‎ करुन दिला. गावाचा विकास‎ करायचा असेल तर युवा गटाची‎ स्थापना करणे महत्वाचे असल्याचे‎ त्यांनी सांगितले.‎ खंबाईत यांनी व्यवसाय करुन‎ स्वत:च्या कुटुंबाची आर्थिक उन्नती‎ करावी तसेच पंतप्रधान/ मुख्यमंत्री‎ रोजगार निर्मिती योजना या योजनेचा‎ लाभ घेवून उद्योग करण्यास‎ सांगितले. देशातील बाजार पेठेचा‎ चिकित्सक पद्धतीने अभ्यास करुन‎ उद्योग सुरु करावा असेही त्यांनी‎ सांगितले.‎

रोकडे यांनी जिल्हा उद्योग‎ विकास केंद्राद्वारे जिल्ह्यामध्ये 60‎ लाभार्थींना प्रशिक्षण देवून 45‎ लोकांना कर्जाचे वाटप केले.‎ त्यापैकी 18 लाभार्थींचे उद्योग सुरु‎ असल्याचे सांगितले.श्रीमती बजाज‎ यांनी विद्यार्थी कसा‎ असावा,जीवनामध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे‎ प्रत्येक गोष्टी शिकण्याची इच्छा‎ आपण सर्वांनी ठेवली पाहिजे,‎ आपले लक्ष ध्येयावरच नेहमी केंद्रीत‎ असले पाहिजे, देशाचे प्रधानमंत्री‎ नरेंद्र मोदी यांनी देश आत्मनिर्भर‎ बनविण्यासाठी उद्योजक होवून‎ स्वत:चा व्यवसाय उभा करण्यास‎ सांगितले आहे. शासनाच्या विविध‎ योजनांचा लाभार्थींनी लाभ घेवून‎ आपला व्यवसाय कसा उभारता‎ येईल याचा संपूर्ण अभ्यास करावा.‎

त्यासाठी प्रत्यक्ष उद्योगांना भेटी‎ दयाव्यात. त्यामधील बारकावे‎ तपासून पाहण्याचे आवाहन त्यांनी‎ केले.‎ या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण‎ दिलेल्या लाभार्थींना प्रमाणपत्राचे‎ वाटप करण्यात आले. प्रशिक्षणार्थी‎ चंद्रमणी सरकटे यांनी आपल्या‎ प्रशिक्षणामुळे उद्योजक कसे बनावे‎ तसेच व्यवसाय कसा करावा हे‎ शिकवले.कार्यक्रमाला मिटकॉन‎ समन्वयक भगत, संजय निमन,‎ श्याम मोरे, आर.टी.चव्हाण, पी.ए.‎ गवळी, तालुका समन्वयक गोपाल‎ करंगे, वाशीम जिल्हयातील विविध‎ युवा गटातील प्रतिनिधी व विद्यार्थी,‎ सामाजिक न्याय विभागातील‎ अधिकारी व कर्मचारी, व्यवस्थापक‎ अनिल गायकवाड व ब्रिक्स प्रा. लि.‎ व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी‎ उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन‎ युवराज राठोड यांनी केले. आभार‎ समतादूत श्रीमती प्रणिता दसरे यांनी‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...