आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्धिक‎ मार्गदर्शक:महिला संरक्षणविषयक कायद्यांवर‎ मोघे महाविद्यालयात कार्यशाळा‎

पांढरकवडा‎ ‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवराम मोघे महाविद्यालय येथे‎ जागतिक महिला दिनानिमित्त‎ महाविद्यालयातील महिला तक्रार‎ निवारण समितीतर्फे स्त्री पुरुष‎ समानता आणि महिला संरक्षण‎ विषयक कायदे या विषयावर‎ एकदिवसीय कार्यशाळा दोन‎ सत्रामध्ये घेण्यात आली.‎पहिल्या सतरा मध्ये बौद्धिक‎ मार्गदर्शक करण्यात आले. तर‎ दुसऱ्या सत्रामध्ये जागतिक महिला‎ दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा घेण्यात‎ आली. या कार्यशाळेचे आयोजन‎ संस्था सचिव विजय मोघे यांच्या‎ प्रोत्साहन आणि मार्गदर्शनात ही‎ कार्यशाळा घेण्यात आली. या‎ कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.‎ अजय सोळंके होते.

त्यांनी‎ विद्यार्थ्यांना महिला संरक्षण विषयक‎ मार्गदर्शन केले. तर उद््घाटक तसेच‎ प्रमुख मार्गदर्शक अॅड. मयुरा नाळे,‎ प्रमुख वक्ते डॉ. अरुण दसोडे यांनी‎ यथोचित मार्गदर्शन केले. संचालन‎ दीक्षा गौतरे तर आभार डॉ. एकता‎ मेंनकुदळे यांनी केले. दुसऱ्या सतरा‎ मध्ये विविध रूपामध्ये रणरागिनी‎ सक्षम कार्य करणाऱ्या ऐतिहासिक,‎ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,‎ सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये‎ कामगिरी करणाऱ्या सक्षम अशा‎ महिलांची रूपे घेऊन वेशभूषा स्पर्धा‎ घेण्यात आली. वेशभूषा स्पर्धेमध्ये‎ ३६ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला.‎ वेशभूषा स्पर्धेचे परीक्षक म्हणून‎ सोनाली ढोरे, प्रियंका निरगुडवार,‎ दीपिका करपते यांनी पाहिले. दुसऱ्या‎ सत्राचे संचलन रेणुका उंबरे तर‎ आभार दीक्षा शर्मा हिने केले. डॉ.‎ उषा राखुंडे, प्रगती टाले, प्रा. भावना‎ मडावी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...