आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पारधी बेडा येथे जागतिक योग दिन; राष्ट्रीय सेवा योजना आणि लोकमित्र ट्रस्ट यांचा संयुक्त उपक्रम

यवतमाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक योग दिनानिमित्त पारधी बेडा याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना आणि लोकमित्र ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसोबत योगाची विविध आसने करुन घेऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी मुलांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपला सहभाग नोंदविला. नियमित योग केल्याने अनेक आजारांना दूर करु शकतो, ही सवय जर लहान वयापासून लागली तर आरोग्य सुदृढ राहते त्यामुळे खेळ भावना निर्माण करणे फार महत्त्वाचे आहे. असे मत राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. रत्नदीप गंगाळे यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील वाशीमकर, प्रा. वसंता वंजारी, लोकमित्र संस्थेचे संस्थापक मिलिंद वंजारी, प्रतिष्ठा काळे, सोनाली मुनेश्र्वर, सचिन रंगे आणि मोहन पारधी, रीना आदी उपस्थित होते. लोकमित्र ट्रस्ट ही संस्था अनेक वर्षापासून पारधी समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत असून लहान मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम करत आहे. त्या माध्यमातून सुजाण नागरिक घडवण्याचे कार्य केले जात आहे.