आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालांत परीक्षा:दहावीचा निकाल 93.31 टक्के ; मुलींनीच मारली निकालात बाजी,विभागात मात्र जिल्हा माघारला

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय जिवनाचा पाया आणि शैक्षणिक जीवनाचा टर्निंग पॉइंट समजल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. १७ जुन रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. त्यात यंदा जिल्ह्याचा निकाल ९६.३१ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्याचा निकाल चांगला लागला असला तरी जिल्हा अमरावती विभागात मात्र ढांग ठरला आहे.

गेल्या २ वर्षांपासून राज्यात सुरु असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला बगल देत ऑफलाईन पद्धतीने दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचा निकाल शुक्रवार दि. १७ जुन रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. त्यात जिल्ह्याचा निकाल ९६.३१ टक्के लागला आहे. यंदा जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला एकूण ३५ हजार २३६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३३ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये १७ हजार ८६३ मुले तर, १६ हजार ६३९ मुली यांचा समावेश आहे. या निकालामध्ये यंदाही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक असल्याने मुलींनीच यंदाही बाजी मारल्याचे दिसत आहे. यावर्षी परीक्षा देणाऱ्यांपैकी ९७.१६ टक्के मुली तर ९५.३६ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

यावर्षी जिल्ह्याचा निकाल चांगला लागला असला तरी अमरावती विभागातील इतर जिल्ह्याच्या मानाने यवतमाळ जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विभागात सर्वाधिक निकाल वाशीम जिल्ह्याचा लागला असुन सर्वात मागे यवतमाळ जिल्हा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा-महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात येत होते. कोरोना वाढलेला प्रादुर्भाव पाहता मागील वर्षीचा निकाल मूल्यमापनाच्या आधारावर काढण्यात आला होता. यंदा करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे प्रत्यक्ष पद्धतीने परीक्षा पार पडल्या होत्या. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत असताना शेवटच्या काही महिन्यात मिळालेल्या संधीचे सोने केले.

दिग्रस । वाळूचे कण रगडीता तेलही गळे, या उक्तीनुसार मी दहावीच्या परीक्षेसाठी सुरूवाती पासूनच परिश्रम घेतले. शाळेत पुर्वीपासून असलेला पहिला क्रमांक यंदाही कायम टिकवायचा हे माझे ध्येय होते. त्यासाठी अभ्यासातील सातत्य हे महत्वाचे ठरले. . आज माझ्या या यशामुळे मी, माझे आईवडील व माझे पुर्ण कुटुंब आनंदी आहे. माझे सर्व गुरूजण, शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी मला सदैव मोलाचे मार्गदर्शन करून माझा आत्मविश्वास द्विगुणित केला. कठोर परिश्रम, शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन व आई वडिलांचा आशीर्वाद हीच यशाची गुरुकिल्ली असते असे मत सायली वास्कर हिने व्यक्त केले.

घाटंजी । तालुक्यातील ग्रामीण भागातील पांढुर्णा (बु) येथील शेतकरी गजानन ठावरी यांची मुलगी आचल हिने आपल्याला डॉक्टर होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असल्याचा ध्यास बाळगूनच अभ्यास करीत दहावीमध्ये ९७.४० टक्के गुण प्राप्त करुन भरघोस यश संपादन केले. आपले वडील शेतीत राबराब कष्ट करून आपल्याला शैक्षणिक खर्च पुरवीत आहे. त्यांच्या स्वप्नांचे ध्येय गाठण्यासाठी मी १० ते १२ तास अभ्यास करायला सुरुवात केला. वर्ग शिक्षक व आणि शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शन मिळाले त्यामुळे मला अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले. मला चांगले डॉक्टर होवुन वडीलांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे.

आर्णी । इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये आर्णी शहरातील श्री. म. द. भारती माध्यमिक विद्यालय आर्णी या विद्यालयात शिक्षण घेणारी धनश्री संतोष पिसरवार ही तब्बल ९७ टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा मान तीने पटकवीला. धनश्रीचे वडील संतोष पिसरवार हे शहरातील शिवनेरी चौकात गाड्यावर भेळ विकण्याचा व्यवसाय करतात. भेळच्या व्यवसायवरच धनश्रीचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा जेमतेम परिस्थिती अभ्यास करुन धनश्रीने हे यश संपादन केले आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई वडील, काका काकू, व शिक्षकांना देते.

महागाव । लहान पाणीच वडिलांचे छत्र हरविलेल्या कृतिका संजय गादेवार या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८ टक्के गुण घेवुन नेत्रदीपक यश मिळतात तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. महागाव शहरातील संजय गादेवार यांचे २०१३ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली होत्या. त्यांच्या अकस्मात जाण्याने खचून न जाता त्यांच्या पत्नी मंजूषा गादेवार यांनी आपली शिक्षिकेची नौकरी सांभाळत आपल्या दोन्ही मुलीला चांगले संस्कार देत शिक्षणाची ओढ लावली . मोठी मुलगी अभियांत्रिकीमध्ये शिक्षण घेत आहे तर लहान कृतिका हिने दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण घेतले.

बातम्या आणखी आहेत...