आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालकांना सॅनिटायझर पाजल्याचे प्रकरण:आशा वर्करने हटकले, मात्र सीएचओने लावला लसीच्या नव्या बॉटलचा तर्क

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिओ लसीऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी जि.प. अध्यक्षांसह आरोग्य सभापतींनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन चौकशी केली असता पोलिओ डोज देताना ही बॉटल चुकीची असल्याबाबत कर्तव्य बजावणाऱ्या आशाने हटकले होते. मात्र, यंदा पोलिओच्या नवीन बॉटल आल्याचा तर्क चक्क सीएचओने लावल्याची धक्कादायक बाब मंगळवारी उघडकीस आली.

दरम्यान, सीएचओ, अंगणवाडी सेविका, आणि आशा या तिघांवर सोमवारी शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. ज्या बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आले त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार आहे.

घाटंजी तालुक्यातील भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कापसी कोपरी गावातील १२ बालकांना पोलिओ डोस म्हणून सॅनिटायझर पाजण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. नंतर रात्री यापैकी काही मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. तदनंतर त्या सर्व बालकांना रात्री यवतमाळ येथील नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तिघांना शिस्तभंग, तर दोघांना नोटिसा
सीएचओ, अंगणवाडी सेविका, आशा ह्या तिघांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तर भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मसराम, डॉ. मनवर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून, २४ तासांत उत्तर मागवले आहे. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल. -डॉ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...