आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा महाप्रकोप:कोरोनाग्रस्तांचा 24 तासांत 37 मृत्यू; आतापर्यंतचे एकाच दिवसात सर्वाधिक मृत्यु, दिवसभरात नवे 810 पॉझिटिव्ह

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यात आतापर्यंत 34 हजार 834 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. त्यातच सोमवार दि. १९ एप्रिल रोजी अवघ्या २४ तासात तब्बल ३७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात झालेल्या मृत्युची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनही हादरून गेले आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता हाताबाहेर जात असल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या आणि कोरोना रुग्णांच्या मृत्युची संख्या वाढण्यास सुरूवात झाली. त्यातच गेल्या २ महिन्यात तर या वाढत्या रुग्णसंखेने कळस गाठला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात दरदिवशी होणाऱ्या मृत्युचे प्रमाण वाढले. प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांच्याकडून अनेक प्रयत्न करुनही जिल्ह्यात कोरोना मृत्युचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यातच सोमवारी तर एकाच दिवशी तब्बल ३७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. आतापर्यंत एकाच दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहे. एका दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने प्रशासनच नव्हे तर संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. तर याच दिवसभरात जिल्ह्यात ८१० नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.

जिल्ह्यात सोमवारी कोरोना तपासणीचे एकूण ४६१९ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ८१० जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ३८०९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या ८१० जणांमध्ये ४७५ पुरुष आणि ३३५ महिला आहेत सध्या जिल्ह्यात ५७२० ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २७७० तर गृह विलगीकरणात २९५० रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१४५७ झाली आहे. २४ तासात ८९२ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ३४८१४ आहे. जिल्ह्यात एकूण ९२३ मृत्युची नोंद आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर ११.८७ असून मृत्युदर २.२३ आहे.

काही ठिकाणी रखडली तपासणी शिबिरे
जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना तपासणी शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. मात्र या शिबिरांमध्ये महत्वाची भूमिका असलेले टेक्निशियन आज बऱ्याच ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यामुळे सोमवारी काही ठिकाणची तपासणी शिबिरे रखडली होती. त्या ठिकाणी नागरिकांना ताटकळत रहावे लागते. बऱ्याच महिन्यांपासून काम करत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यातूनच हा प्रकार घडला आहे.

जिल्हा रुग्णालयातील बेड झाले फुल्ल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५७७ बेड असून त्यापैकी पूर्ण पुर्ण ५७७ बेड भरलेले आहेत. या ठिकाणी असलेल्या ४१० ऑक्सिजन बेडपैकी ३८७ जणांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र उर्वरीत २३ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता नसतानाही ते ऑक्सिजन बेडवर भरती आहे. आता जिल्हा रुग्णालयातच रुग्णांना बेड नाही तर गरजूंनी उपचारासाठी जावे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिवसभरात ८९२ जण झाले कोरोनामुक्त
जिल्ह्यात कोरोनाचे हजारो रुग्ण दरदिवशी आढळून येत आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात दरदिवशी शेकडो रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परत जात आहेत. त्यातच सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात ८९२ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आता जिल्ह्यात आतापर्यंत ३४८१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...