आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराव्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून आईने 5 लाख रुपयांची सुपारी देत खून करवून घेतल्याची खळबळजनक घटना लोहारा पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडकीस आणली. सोमवारी लोहारा पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले.
योगेश विजय देशमुख (28) रा. नेरपिंगली ता. मोर्शी जि. अमरावती असे मृताचे नावे आहे. चौसाळा जंगलात एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर विकी भगत रा. देवी नगर याने दिली. ही माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.
यावेळी कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह त्या ठिकाणी आढळुन आला. या मृतदेहाची पाहणी करीत असताना विकी भगत याने मृतदेहासंदर्भात काही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांना लगेच त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मित्रासोबत मिळून खून केल्याची कबुली दिली.
इतकेच नव्हे तर मृत योगेश याच्या आईनेच त्याचा खून करण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा त्याने केला. योगेश हा व्यसनाधीन असून तो त्याची आई वंदना देशपांडे यांना त्रास देत होता. त्याचा त्रास असह्य झाल्याने वंदना देशपांडे यांनी यवतमाळ येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घरी येवुन त्याचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. त्यात मृताची मावशी उषा चौधरी त्यांचे पती मनोहर चौधरी, त्यांचा मुलगा लखन चौधरी यांच्या देवी नगर येथील घरी बसून खुनाचा कट रचला.
त्यात आरोपी विकी भगत आणि राहुल पठाडे रा. देविनगर लोहारा यांना ५ लाख रुपयांची सुपारी देवुन योगेशचा खुन करण्यास सांगण्यात आले. त्यासाठी २ हजार रुपयांचा अॅडव्हान्स ही देण्यात आला. त्यावरुन दोन्ही आरोपींनी २० एप्रिल रोजी योगेश देशपांडे याला चौसळा जंगलात नेवून त्याचा खुन केला. ही माहिती मिळताच लोहारा पोलिसांनी विकी भगत याला सोबत घेत इतर आरांपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीसह लोहारा पोलिस पथक.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.