आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्रेसर:यवतमाळ जिल्हा सामाजिक कार्यात अग्रेसर ; कोविड काळात केलेल्या कार्याचे कौतुक

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संघटनेने कोविड काळात केलेल्या कार्याचे कौतुक केले व संघटनेच्या स्थापने पासून यवतमाळ जिल्हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिला आहे त्याचे श्रेय फक्त कार्यकर्त्यानच आहे. असे मत कार्यकर्ता सभेत जैन संघटना राज्याध्यक्ष हस्तिमल बंब यांनी केले. भारतीय जैन संघटना महाराष्ट्र संपर्क दौरा अंतर्गत राज्य अध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या विदर्भ पश्चिम विभाग मुख्यालय येथे कार्यकर्त्यांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर सभेचे अध्यक्ष महेंद्र सुराणा, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याध्यक्ष हस्तिमल बंब, राज्य सहसचिव रत्नाकर महाजन, विदर्भ अध्यक्ष संजय आचलिया, मार्गदर्शक सुभाष आचलिया होते. पुढे बोलतांना रत्नाकर महाजन यांनी केलेले कार्य उत्कृष्ट आहे पण येथेच न थांबता यापेक्षाही चांगले कार्य कसे करता येईल यावर विचार करण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले. विदर्भ अध्यक्ष संजय आचलिया, सुभाष आचलिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महेंद्र सुराणा यांनी आगामी कार्यकाळा साठी जिल्हाध्यक्ष पदी महेंद्र बोरा, दिलीप रेदासनी, संदीप मुनोत, सुशील कटारिया यांचे नावाची घोषणा केली. यावेळी राज्याध्यक्ष हस्तिमल बंब, संजय आचलिया यांचा शाल व श्रीफळ, माळ देऊन सत्कार डॉ. शेखर बंड, प्रवीण तातेड, संदीप मूनोत, दिलीप रेदासणी, सुशील कटारिया, महेंद्र बोरा यांनी केला. राज्य सहसचिव रत्नाकर महाजन यांचा सत्कार वंदना बोरूंदिया, चंदा खाबिया, शोभा पंडित, मिताबेन शहा, इलाबेन शहा यांनी केला. संचालन शेखर बंड तर कार्याचा आढावा शहराध्यक्ष किर्ती मुथा, आभार जिल्हाध्यक्ष महेंद्र बोरा यांनी केले. कार्यक्रमात राजेंद्र मुणोत, प्रमोद मुथा, धीरज तोडरवाल, दीपक टोपरे, प्रकाश बोरुंदीया, रवी सिंगवी, आनंद चौधरी, पुष्पा तोडरवाल, वर्षा तातेड, रेणू कटारिया, सविता भरुट, स्वाती आचलिया, डॉ. सारिका शाह, ममता बाफना, तृप्ती पारेख, आरती खिवसरा, पुष्पा सावला, अनीला सावला, रीता वाघेर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...