आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यवतमाळ:स्नान करताना पितापुत्राचा नदीत बुडून मृत्यू, बुडालेल्या चारपैकी दोघांना काढण्यात यश

घाटंजीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पूजापाठनंतर अंघोळीसाठी वाघाडी नदीत उतरलेल्या पितापुत्राचा बुडून मृत्यू

पूजापाठनंतर अंघोळीसाठी वाघाडी नदीत उतरलेल्या चौघांपैकी पितापुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी सुमारास घाटंजी (जि. यवतमाळ) येथे घडली. संजय शिवप्रसाद अग्रहरी(४५) आणि मुलगा आदित्य (१२) अशी त्यांची नावे आहेत.

घाटंजी शहरातील रहिवासी अग्रहरी कुटुंबातील सर्व सदस्य रविवारी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने शनिमंदिरात पूजापाठ करण्यासाठी गेले होते. पूजेनंतर कुटुंबातील चार सदस्य स्नान करण्यासाठी वाघाडी नदीपात्रात उतरले. परंतु पाण्याच्या अंदाज न आल्याने मुलगा आदित्य गटांगळ्या खाताना दिसताच वडील संजय अग्रहरी मुलास वाचवण्यासाठी गेले असता दोघेही पितापुत्र नदीत बुडाले. हा प्रकार सुभाष सायरे यांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. 

या वेळी कुटुंबातील दुसरा एक मुलगा पाण्यात बुडत असताना त्याला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर या दोन्ही पितापुत्रांना काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली. दोघांचेही मृतदेह नदीबाहेर काढून उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...