आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगारी ताब्यात:यवतमाळ जुगार अड्ड्यावर धाड, आठ जुगारी ताब्यात

यवतमाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंजी पत्ता जुगार अड्ड्यावर अवधुतवाडी पोलिसांनी धाड टाकून पोलिसांनी आठ जुगारींना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवार, दि. २२ सप्टेंबरला दुपारच्या सुमारास एमएसईबी कार्यालय परिसरातील भिंतीजवळ करण्यात आली.

गुरूमुख कोटवानी वय २८ वर्ष रा. वैद्य नगर, रमेश कैतवास वय ४४ वर्ष रा. सिंघानीया नगर, रवि धुमाळ वय ४० वर्ष रा. लक्ष्मी नगर, विकास ठाकरे वय २४ वर्ष रा. पिंपळगाव, प्रमोद टेकाम वय ३२ वर्ष रा. उमरसरा, संकेत येरकंडवार वय २२ वर्ष रा. अमराईपूरा, धामानंद मस्के वय ३२ वर्ष रा. कार्ली, अब्दुल उजेर अब्दुल काशीर रा. यवतमाळ, अशी त्या आठ जुगारींची नावे असून त्यांच्याकडून ८ हजार १४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.