आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळमध्ये गॅसचा स्फोट:एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात मायलेकीचा जागीच मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक; आर्णीतल्या आयता गावातील घटना

यवतमाळ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात मायलेकींचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून गॅस पेटवताना हा स्फोट झाला. प्राप्त माहितीनुसार, काजल विनोद जैस्वाल (वय 30) व वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय 5) अशी मृतकांची नावे आहेत. स्फोटामुळे घराला आग लागून संपूर्ण घर जळून नुकसान झाले.

कुटुंबातील व्यक्ती घरून पेट्रोल, डिझेलची विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग फोफावली. आग नियंत्रणात आणण्यासाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. आगीत घरातील सर्व वस्तू भक्ष्यस्थानी सापडली.

गॅस पेटविताना दुर्घटना
काजल गॅस पेटवण्यासाठी गेल्या. तेव्हा मोठा स्फोट झाला. या स्फोटात त्या भाजल्या. त्यांच्या बाजूलाच अससेली मुलगी वैभवलक्ष्मी होरपळली. यात त्यांचा अंत झाला.

बातम्या आणखी आहेत...