आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेर आरक्षणाने बिघडवले गणित:यवतमाळ पालिकेत पर्याय शोधण्यासाठी धडपड

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायालयाच्या निकालानंतर ओबीसी आरक्षणासह नगर पालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. मात्र नव्याने काढण्यात आलेल्या या निवडीनंतर पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे गणित बिघडले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पर्यायी प्रभाग मिळवता येइल का यासाठी आता त्यांनी धडपड सुरू केली आहे.

मध्यंतरी रखडुन पडलेल्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गेल्या काही दिवसांपुर्वी नगर पालिका सदस्यांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह निवडणुका पार पडतील असा निर्णय दिला आहे. इतकेच नव्हे तर दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचेही निर्देश राज्य निवडणुक आयोगाला दिले आहेत. त्यावरुन निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशावरुन जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत बुधवार दि. २७ जुलै रोजी काढण्यात आली. मात्र या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील एकमात्र अ दर्जाची नगर पालिका असलेल्या यवतमाळ पालिकेत यंदाच्या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचे गणित बीघडले.

नगर पालिकेत ओबीसी आरक्षणानुसार नव्याने सोडत काढण्यात आल्याने पुर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणात बदल झाला. त्याचा परिणाम होवुन कही खुशी तर कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या नगर पालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. त्यात मोठ्या राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये परफॉर्मन्स न दाखविणाऱ्या बऱ्याच उमेदवारांना यंदा राजकीय पक्ष घरचा रस्ता दाखवणार असल्याचे बोलल्या जात आहे. याच संधीचा फायदा घेत इतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. काहींच्या तयारीला या आरक्षणामुळे ब्रेक लागला आहे. असे असले तरी इतर प्रभागात आपल्याला काही संधी आहे काय किंवा नेमक्या एका पक्षाच्या भरवशावर न राहता दुसऱ्या पक्षाच्या माध्यमातुन संधी मिळेल काय याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.

थेट नगराध्यक्षपदाच्या निर्णयाने धास्ती
थेट जनतेमधून नगराध्यक्ष निवडीचा निर्णय यंदाही शासनाने घेतला आहे. याच पद्धतीने निवडणुक झाल्यानंतर गेल्यावेळी नगर पालिकेत बहुमत एका पक्षाचे आणि नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचे अशी परिस्थिती कायम होती. त्याचा फटका बसुन पाच वर्षात पालिकेत केवळ कुरघोडीचे राजकारण दिसुन आले. यंदा पुन्हा तशीच परिस्थिती झाल्यास शहराच्या विकासाचा मात्र बट्ट्याबोळ होणार हे खरे.

बातम्या आणखी आहेत...