आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील महिला पोलिस‎ अधिकारी टार्गेट‎:महिला पोलिस अधिकारीला अश्लील‎ मॅसेज करणाऱ्या भामट्याला अटक‎, तीन दिवसाची पोलिस कोठडी‎

यवतमाळ‎ ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका महिला पोलिस‎ ‎ अधिकारी यांना फोनवर‎ ‎ शिविगाळ करीत‎ ‎ अश्लील मॅसेज‎ ‎ करणाऱ्या भामट्याला‎ ‎ पोलिसांनी अटक केली.‎ ही कारवाई शुक्रवार, दि. ५ मे रोजी सोलापूर‎ जिल्ह्यातील लहु येथे करण्यात आली आहे.‎

मारोती लुंगशे रा. लहू ता. माडा, जि.‎ सोलापूर, असे अटक करण्यात आलेल्या‎ भामट्याचे नाव आहे. शनिवार, दि. ६ मे‎ रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले‎ असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली आहे.‎

शहर पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या ‎ माहितीनूसार, शहरातील एका उच्च पदस्थ ‎ ‎ पोलिस अधिकारी महिलेच्या मोबाईल‎ नंबरवर अनोळखी व्यक्तीने ३ डिसेंबर २०२२ ‎ ‎ रोजी संपर्क साधून शिविगाळ करीत‎ अश्लील मॅसेज केला. या प्रकरणाची गंभीर ‎ ‎ दखल घेत त्यांनी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‎घटनेची माहिती दिली.

वरिष्ठांनी‎ सुचवल्यानुसार शहर पोलिस ठाण्यात‎ अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल‎ केली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा ‎ ‎ नोंद करीत तपास सुरू केला होता. सदर‎ व्यक्ती हा सोलापूर जिल्ह्यात असल्याची‎ माहिती यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या‎ डीबी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या ‎ ‎ आधारावर ही कारवाई करण्चात आली.‎

सोलापूर स्टेशनवर एका व्यक्तीचा मोबाईल‎ मारोती लुंगशे या भामट्याला सापडला होता.‎ मारोती लुंगशे याच्यामध्ये पीएसआय‎ बनण्याचे भुत होते. तसेच त्याचे एका‎ मुलीसोबत ब्रेकअप झाले होते. त्यामुळे हा‎ भामटा महाराष्ट्र पोलिस या साईडवरून नवी‎ मुंबई, नाशिक, पुणे येथील महिला‎ अधिकारी, सिव्हील महिलांचे नंबर मिळवून‎ त्यांना फोन आणि मॅसेज करीत त्रास देत‎ होता. असे अनेक प्रकार ह्या भामट्याने‎ केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली आहे.‎