आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूनाचा आरोप:विवाहितेची आत्महत्या, मृतदेह रुग्णालयात सोडून सासरचे फरार; वेणूताईंच्या दंड, बरगड्यांवर मारहाणीचे व्रण

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वाघनाथ येथे एका विवाहितेने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. मात्र ही आत्महत्या नसून आपल्या लेकीचा सासरच्यांनी पैशांसाठी छळ केल्याचा आरोप गळफास घेतलेल्या महिलेच्या माहेरच्यांनी केला आहे.

वेणूताई आशिष पानपट्टे या 30 वर्षीय विवाहितेने मंगळवारी आत्महत्या केली. मात्र महिलेला सासरच्यांनी फासावर सासरच्यांव्यतिरिक्त इतर कोणीही पाहिल्याचा पुरावा नाही. त्याचप्रमाणे महिलेच्या हातावर, दंडावर असलेले काळेनिळे व्रण तिला मारहाण झाल्याची साक्ष देत आहेत. आपल्या सुनेला रुग्णालयात भरती करुन सासरची मंडळी गायब असल्याने त्यांच्यावरील संशय बळावत चालला आहे.

नवलाईचे दिवस संपले

दहा वर्षांपूर्वी वेणूताई पंजाब ठाकरे यांचा 2013 मध्ये यवतमाळच्या वाघनाथ येथील आशिष खुशाल पानपट्टे यांच्याशी विवाह झाला. नव्याच्या नवलाईचे दिवस संपले आणि सासरच्यांचा खरा रंग वेणूताईंना दिसू लागला. मात्र एक भारतीय स्त्री जसे याकडे दुर्लक्ष करते. आपल्या आईवडिलांच्या इज्जतीवर गदा येऊ नये यासाठी वेणूताईंनी सासरच्याच घराला आपले मानले.

संसारवेलीवर 2 फुले उमलली

दिवस जाऊ लागले. तसतसा छळही वाढत होता. पती आशिष, सासू रंजना, सासरे खुशाल, दीर आप्पाराव, जाऊ शुभांगी आणि नणंद निलूबाई अंबोरे यांनी हुंड्यासाठी त्यांचा अन्वयित असा छळ चालवला. मात्र तोपर्यंत त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली होती. वेणूताई यांना दोन मुले होती.

माहेरी आणून सोडले

पती आशिष वेणूताईंना माहेरुन 2 लाख आण म्हणून तगादा लावत होता. मात्र त्यांनी या गोष्टीला नकार दिला. त्यानंतर पती आशिषने वेणूला मारहाण 1 ऑगस्ट 2022 रोजी माहेरी आणून सोडले होते. तिने अनेकदा छळाची माहिती आई, वडील व भावांना दिली. मात्र, परिस्थिती पूर्ववत होईल, या आशेने माहेरचे तिची समजूत काढत होते.

पोलिसांची भूमिका संशयास्पद

मंगळवारी सायंकाळी वेणूने फाशी घेतल्याचा निरोप फोनवरून मिळाल्यानंतर माहेरची मंडळी वाघनाथ येथे धडकली. तोपर्यंत तिचा मृतदेह सवना ग्रामीण रुग्णालयात हलवला होता. तेथून सासरकडील सर्वजण मृतदेह बेवारस सोडून निघूनही गेले. मृताचा भाऊ ओमकार ठाकरे यांनी महागाव ठाण्यात तक्रार दिली. परंतु, पोलिसांनी ती दाखल करून घेण्यास रात्र घालवली.

वेणूताईंच्या दंडावर, बरगड्यांवर आणि कानशिलावर मारहाणीचे व्रण ठळकपणे उमटलेले दिसत आहेत. तिचा सासरच्यांनी फाशी देऊन खून केला व आत्महत्येचा बनाव केल्याचा आरोप तिचा भाऊ ओमकार पंजाब ठाकरे यांनी तक्रारीतून केला आहे. पॉस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.