आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरव यात्रेला शनिवारी दारव्हेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजप शिवसेना युतीद्वारे ही गौरव यात्रा ८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून काढण्यात आली. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून सुरू झालेली यात्रा शहरातील कारंजा नाका, दुर्गा चौक, उत्तरेश्वर चौक, बाराभाई मोहल्ला, भाजी मार्केट, शिवाजी चौक, मानतेली चौक, एकता चौक, जैन मंदिर रोड, आठवडी बाजार, गवळीपुरा, वर्षा टॉकीज ते सोशल क्लब मैदानापर्यंत पदयात्रा करत पोहोचली. या यात्रेचा समारोप सोशल क्लब मैदानावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व मान्यवरांच्या मनोगताने झाला.
या यात्रेत भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, प्रमुख वक्ते प्रा. नितीन खर्चे, भाजप जिल्हा सरचिटणीस दत्तात्रय राहाणे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव प्रा. अजय दुबे, शिवसेना तालुकाप्रमुख मनोज सिंगी, भाजप तालुकाप्रमुख घनश्याम वानखडे, राजू दुधे, धनंजय बलखंडे यांच्यासह भाजप शिवसेना कार्यकर्ते तथा राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. या यात्रेत सहभागी झालेल्यांनी ‘होय, मी सावरकर'' अशा भगव्या टोप्या परिधान करून आकर्षण निर्माण केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.