आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करताना पंखा डोक्यात पडून तरुणाचा मृत्यू; यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगी येथील घटना

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्थिक परिस्थती बेताची

गेल्या तीन वर्षांपासून हेलिकाॅप्टर बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचे १५ ऑगस्टला आकाशात हेलिकाॅप्टर उडवण्याचे स्वप्न होते. मंगळवारी रात्री त्याने ट्रायल घेण्याचा प्रयत्न केला. परंतु निर्माणाधीन हेलिकाॅप्टरचा मागील पंखा उडून तरुणाच्या डोक्याला लागला आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. शे. इस्माईल शे. इब्राहिम (२८, रा. फुलसावंगी, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे.

स्थानिक बसस्थानक परिसरात शे. इस्माईल याचे वेल्डिंग वर्कशॉप आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या मनात टाकाऊ वस्तूंपासून हेलिकॉप्टर बनवण्याचा विचार आला. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. १५ ऑगस्टला हेलिकाॅप्टर उडवण्याचे त्याचे नियाेजन होते. हेलिकाॅप्टरचे काम अंतिम टप्प्यात होते. त्यानुसार मंगळवारी त्याने प्रथम हेलिकाॅप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला.

मात्र येथेच नशिबाने घात केला. हेलिकाॅप्टर उडवताना पंख्याचा रॉड तुटून त्या युवकाच्या डोक्यावर पडला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर परिसरातील तरुणांनी त्याला तातडीने उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अविवाहित असलेला मुन्ना ऊर्फ इस्माईल याच्यामागे आई, वडील एक भाऊ व एक बहीण असे कुटुंब आहे.

अर्थिक परिस्थती बेताची
इस्माइल हा अल्पशिक्षित होता. मात्र, असे असतानाही त्याला नवे काही करण्याची उमेद गप्प बसू देत नव्हती. त्यामुळेच त्याने हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले. मात्र, पूर्ण झाले नाही. त्याची अर्थिक परिस्थितीही बेताचीच होती.

बातम्या आणखी आहेत...