आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग:युवकाला पोलिसांनी दिला चोप; वडगाव परिसरातील घटना, अवधुतवाडी ठाण्यात गुन्हे नोंद

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या २५ वर्षीय युवकाला पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. ही घटना शहरातील वडगाव परिसरात घडली असून गणेश झिलपे रा. गोपीकृष्ण पार्क, वडगाव असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील वडगाव परिसरातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. ५ मे रोजी सायंकाळी खेळून घरी आली होती. त्यानंतर ती नेहमी प्रमाणे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. यावेळी खिडकीतून अचानक एक युवक मोबाइलने फोटो काढतांना त्या मुलीला आढळून आला. यावेळी तिने आरडाओरड करीत ही बाब कुटुंबीयांना सांगितली.

दरम्यान कुटुंबीयांतील सदस्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यावेळी गणेश झिलपे हा हातात मोबाईल घेवून आढळून आला. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी मोबाईल दाखव, काय करत आहे, याबाबत विचारणा केली. मात्र त्याने मोबाईल देण्यास चक्क नकार दिला. त्यामूळे संतापलेल्या कुटुंबीयांनी थेट तो मोबाईल घेत अवधुतवाडी पोलिस ठाण्यात आले.

या प्रकरणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश झिपले याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. त्यानंतर सोमवारी पोलिसांनी गणेश झिलपे याला ताब्यात घेत चांगलाच चोप दिला. त्यावेळी त्याने मोबाईलमध्ये फोटो काढण्याची कबूली पोलिसांना दिली. यावेळी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल शेजव, कर्मचारी सागर पत्ते करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...