आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गळफास:शहरातील लॉजमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

वणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका लॉजमध्ये युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, दि. १० सप्टेंबरला पहाटे उघडकीस आली. मृत हा भीमनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. त्याने स्वमर्जीने लग्न केल्यानंतर तो पत्नीसह लॉजवर रहात होता. शुक्रवारी मध्यरात्री त्याने लॉजच्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. अंकित चिकाटे वय अंदाजे २६ वर्ष असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

भीमनगरात राहणाऱ्या अंकितने स्वमर्जीने लग्न केल्यानंतर तो पत्नीसह शहरातील उदय विलास लॉजवर रहात होता. त्याला वडील नसून आई व बहीण असा आप्त परिवार आहे. त्याने स्वमर्जीने लग्न केल्यानंतर त्याचे आई बरोबर वाद होत होते. त्यामुळे आईने त्याला वेगळे राहण्यास सांगितल्याचे बोलल्या जात आहे. त्यानंतर तो आपल्या पत्नीसह लॉजवर रहायचा. तो मद्यपानही करीत असल्याचे ऐकायला मिळत आहे. शनिवारी पहाटे अंकित हा उदय लॉजमधील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पुढिल तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...