आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:युवकाची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट

घाटंजीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील संत मारोती वार्डातील रहिवासी असलेल्या युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, दि.५ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली. विक्रम महेंद्रसिंग गौर वय ३४ वर्ष रा. घाटंजी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

शहरातील प्रतिष्ठित नागरिक नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष यांचे भाचा विक्रम गौर हा मूळचा नांदेडचा असून काही वर्षांपासून घाटंजी येथे वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पत्नीच्या निदर्शनास आली. त्यावेळी मृताच्या पत्नीने हंबरडा फोडला असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी घराभोवती जमाव झाला होता. या घटनेची माहिती घाटंजी पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या आत्महत्येचे नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. मृताच्या मागे आई, पत्नी, मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...