आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआक्रोश आंदोलन:इंधन दरवाढ, महागाईविरोधात युवक काँग्रेसची बाभुळगाव येथे एल्गार यात्रा; तहसीलदारांना निवेदन

बाभुळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारद्वारे दररोज पेट्रोल, डिझल, गॅस सिलिंडर, बांधकाम साहित्य, कृषी साहित्य, औषधी व जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेल्या त्रासामुळे युवक काँग्रेस बाभुळगाव तालुका व राळेगाव विधानसभा यांच्या वतीने बैलगाडी, ट्रॅक्टर, मालवाहतूक ऑटो तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दि. ६ एप्रिलला एल्गार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्र शासनाच्या जनता विरोधी धोरणांमुळे दररोज होत असलेल्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असून सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. आधीच्या काँग्रेस राजवटीत कधीच जनतेला अशा प्रकारे वेठीस धरून त्यांचा खिसा रिकामा करण्यात आला नाही. हे बहुतेक आताचे सरकार विसरले आहे. या सरकारचे कान उघडण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चाचे आयोजन करण्यात आले. हा मोर्चा पेट्रोल पंपापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाच्या माध्यमातून जनतेच्या भावना सरकार पर्यंत पोहचवाव्यात, जेणेकरून कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

यावेळी नायब तहसीलदार पांडे यांनी स्वीकारले. या मोर्चामध्ये युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक चंद्रशेखर परचाके, राळेगाव विधानसभा अध्यक्ष विपुल बोदडे, अक्षय राऊत, विलास चांदेकर, प्रवीण सपकाळ, अभिलाष शेळके, सागर राऊत, वृषभ, गुल्हाणे, तेजस गावंडे, अतितोश, कार्तिक भारती, संघपाल डोफे, स्वप्निल चौधरी, राहुल देशमुख, नितेश सरकार, निखिल गाडगे, वैभव जयपूरकर, सागर मसकर, पंकज खडसे, प्रज्ज्वल राऊत, मुकेश बोबडे, शाहरूख खान, स्वप्निल वानखडे, स्नेहल दिघाडे, वि. मा. राऊत, सारंग गुजर, रफिकखा पठाण, विजय कुमरे, पंकज गावंडे, पुंडलिक कोल्हे, गजानन कुंभेकर, शहेजाद शेख, संजय कोल्हे, अक्षय मोहर्ले, अजय विरूटकर, शंतनू गावंडे, मुस्तफा खान, भारत कांबळे, पंकज गिमोणकर, संकेत देषमुख, अक्षय बोदडे, अमित मसकर, शुभम इंगोले, प्रवीण मदनकर आदि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...