आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कार अपघातात तरुणाचा मृत्यू

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील आनंद फायनान्स कंपनीच्या वाहनाला वर्धा जिल्ह्यातील शेलू नजीक अपघात होऊन यात यवतमाळ येथील भावेश सुशील भरुट (जैन) या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर इतर चौघे किरकोळ जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, नागपूर येथील साक्ष गंधाच्या कार्यक्रमासाठी भावेश भरुट हा मारुती सिहाज या वाहनातून यवतमाळ वरुन नागपूरकडे जात होता. यावेळी शेलु जवळील भोयर कॉलेज नजीक रस्ता थोडा दबुन असल्याने भावेश भरुट यांचे नियंत्रण सुटून समोरुन येणार्‍या आयशर ट्रकला जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. रस्त्यालगत कटड्याला जावून ही गाडी धडकली. या अपघातातील जखमींना अथक परिश्रमानंतर बाहेर काढण्यात आले. यामध्ये भावेश भरुट या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जखमींना सावंगी मेघे व नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...