आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद बांधकाम विभाग एक आणि दोनला आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून २० कोटी २५ लाख रूपये मिळाले आहे. यात बांधकाम विभाग क्रमांक एकचे १३८, तर बांधकाम दोनचे १६६ कामे प्रस्तावित आहे. सध्या ह्यातील काही कामांचे करार नामे झाले असून, बहुतांश कामांचे करार नामे शिल्लक आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्याला केवळ ८६ लाख रूपये दिले.
आर्थिक वर्षांच्या सरतेशेवटी विविध शीर्षकाखाली निधी प्राप्त होतो. यात सर्वाधिक फोकस बांधकाम विभागावर राहत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यंदाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाला आमदार, खासदार निधीतून कोट्यवधी रूपये प्राप्त झाले आहे.
प्राप्त झालेल्या निधीतून सिमेंट रस्ते, सभागृह, खडीकरण, हायमास्ट लाईट, सौरपथदिवे यासह इतरही कामांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एककडे १३८ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, ६ कोटी ९२ लाख ९१ हजार रूपये आमदार, खासदार निधीतून प्राप्त झाले आहे.
त्याचप्रमाणे बांधकाम विभाग क्रमांक दोनकडे १६६ कामे प्रस्तावित असून, ह्यात १३ कोटी ३२ लाख ६१ हजार रूपये आमदार फंडातून प्राप्त झाले आहे. यातील बहुतांश कामांचे करार नामे झाले नाही. आर्थिक वर्षांच्या शेवटच्या दिवशी निधी प्राप्त झाल्यामुळे येत्या काळात ही कामे होणार आहे. विशेष म्हणजे आमदारांनी मोठ्या प्रमाणात बांधकाम विभागाला निधी दिला, परंतू पाणी पुरवठा विभागाला केवळ ८६ लाख रूपये दिल्याने विविध विषयाला पेव फुटले आहे. यावरून आमदारांचाही सर्वाधिक फोकस रस्त्याच्या कामावर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाणी पुरवठ्याला केवळ ८६ लाख रूपये दिले आहे. पावसाची अनियमितता व पावसातील खंड यामुळे टंचाई परिस्थिती निर्माण झाल्यानंतर करावयाच्या उपाय योजनांवर हा निधी अपुरा ठरू शकतो.सोबतच दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजना राबवताना अडचणी निर्माण हौऊ शकतात.
गतवर्षी ३६३ हायमास्ट लाईटला दिला निधी
ग्रामीण भागात हायमास्ट लावण्याची प्रथा कमालीची वाढली आहे. याचे वीज बिल भरताना ग्रामपंचायतीच्या नाकीनऊ येते. तरीसुद्धा आमदार, खासदार, जनसुविधा आदी योजनांमधून हायमास्ट लाईट लावण्याचे प्रकार वाढले आहे. गतवर्षी एका आमदाराने चक्क ३६३ हायमास्ट लाईट लावण्याकरता निधी दिला होता. साधारणत: एक लाख रुपयांच्या आतील हे काम होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.