आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनेशन घेताना रंगेहाथ पकडले:प्रवेश शुल्क प्रकरणात मुख्याध्यापकासह 1 अटकेत

माजलगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिद्धेश्वर विद्यालयात मंगळवारी (१४ जून) प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेताना रंगेहाथ पकडलेल्या दोन शिक्षकांची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. दरम्यान, पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक बाबूराव आडे व एका खासगी व्यक्तीला बुधवारी ताब्यात घेतले.

अंबाजोगाई येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजलगावात श्री सिद्धेश्वर विद्यालय आहे. विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे पालकांनी केली होती. त्यानंतर मंगळवारी आमदार सोळंके यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन स्टिंग ऑपरेशन केले. त्यावेळी वैष्णवी मंगल कार्यालयात सिद्धेश्वर विद्यालयाचे तीन शिक्षक विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाच्या नावावर पैसे घेत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून १ लाख ७६ हजार रुपये व कागदपत्रे जप्त केली. तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक पळून गेला, तर दोन शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी सदाशिव ढगे व परमेश्वर आदमाने या शिक्षकांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. एस. गोसावी यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठावली.

अन्यथा शिक्षक करणार काम बंद
दोन शिक्षक व मुख्याध्यापक यांना या प्रकरणात गोवण्यात आले असून मुख्य सूत्रधार मोकळा आहे, त्यामुळे त्याला ताब्यात घ्यावे, अन्यथा शिक्षक काम बंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

बातम्या आणखी आहेत...