आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नात्याला काळिमा:1 कोटी विम्यासाठी 10 लाखांत पतीच्या खुनाची सुपारी दिली, पत्नीसह दोघे अटक

बीड | प्रतिनिधी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटक केलेल्या आरोपींसह तपास पथक.

एक कोटी रुपयांच्या विम्यासाठी पत्नीनेच 10 लाख रुपयांत पतीच्या खुनाची सुपारी दिली व खुनानंतर अपघाताचा बनाव केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याची उकल केली. यात पत्नीसह दोन आरोपींना गजाआड केले. एसपी नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली.

पिंपरगव्हाण शिवारात 11 जून रोजी मंचक गोविंद पवार (रा. बीड) यांचा मृतदेह आढळून आला होता. जवळच दुचाकीही होती. त्यामुळे अपघातात हा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत होते. मात्र, पोलिसांच्या तपासात मंचक पवार यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतीश वाघ व उपनिरीक्षक संजय तुपे यांनी तपासाची चक्रे फिरवली. नातेवाइकांच्या चौकशीत संशय आल्याने अधिक खोलात गेले असता मंचक यांनी 1 कोटींचा जीवन विमा उतरवला होता. या पैशांसाठी पत्नी गंगाबाई हिनेच 10 लाख रुपयांत श्रीकृष्ण सखाराम बागलाने (२७, रा. काकडहिरा) याला व त्याच्या तीन मित्रांना पतीच्या खुनाची सुपारी दिली होती. या पैकी 2 लाख इसारही दिल्याचे समोर आले.

या प्रकरणात पोलिसांनी गंगाबाई पवार, श्रीकृष्ण बागलाने, सोमेश्वर गव्हाणे (रा. पारगाव सिरस) यांना अटक केले. तर 2 जण फरार आहेत. पीआय सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय संजय तुपे, कर्मचारी कैलास ठोंबरे, नसीर शेख, अभिमन्यू औताडे, सतीश कातखडे, अशोक दुबाले, गणेश हंगे, राहुल शिंदे, आश्विन सुरवसे, गणेश मराडे, संपत तांदळे, अतुल हराळे यांनी ही कारवाई केली.

अन् अपघातचा बनाव

श्रीकृष्ण बागलाने याने मंचक पवार यांना 10 जून रोजी रात्री भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याच्या डोक्यात वार करून खून केला. मृतदेह दुचाकीवर घेऊन जाऊन ती एका टेम्पोला धडकवून अपघाताचा बनाव केला.

बातम्या आणखी आहेत...