आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अंबाजोगाईमध्ये 1 तास राष्ट्रवादीसाठी; महिला आघाडीच्या वतीने राबवला गेला उपक्रम

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई तालुक्यात एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम महिला आघाडीच्या प्रा. अंजली पाटील यांच्या नेतृत्वात राबवण्यात आला. विविध भागात कार्यक्रम घेण्यात आले.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक तास राष्ट्रवादी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांमध्ये वाघाळा व अंबा साखर कारखान्यावरील महिलांनी सहभाग नोंदविला .खा.शरद पवार यांचे ध्येय धोरण समाजातल्या तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा काम या एक तास राष्ट्रवादीच्या कार्यक्रमा मार्फत करण्यात आले.

प्रा.अंजली पाटील यांनी महिलांनी बाहेर पडून पक्ष बळकटीसाठी तसेच शासनाच्या विविध योजना कोणकोणत्या आहेत ते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवावी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी रेणुका कांबळे, नलिनी साखरे, स्वाती लोंढे, निशा जोगदंड, अहिल्या शिंदे, पुष्पा निर्मळ, दुर्गा शिंदे, आशा शेवाळे, आशा शिंदे, प्रतिभा शर्मा, रेवती लोमटे, अलका कोकाटे, सीमा साळुंके, अंजली लोमटे, मंगल साळुंके, उषा देशमुख यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...