आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक दिव्यांग दिन विशेष:दिव्यांग असताना लिहिली 10 पुस्तके; अभ्यासक्रमातही समावेश

रवी उबाळे | बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचार्या प्रीती पोहेकर - Divya Marathi
प्राचार्या प्रीती पोहेकर

एका हाताने दिव्यांग असताना वडिलांनी दिलेल्या पाठबळामुळेच प्राचार्या प्रीती पोहेकर यांना मोठी ताकद मिळाली. सलग २३ वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. २००८ ते २०२२ या १४ वर्षांत त्यांनी लाेकप्रशासनासंदर्भात १० पुस्तके लिहिली. राज्यातील तीन विद्यापीठांनी महाविद्यालयीन अभ्यासक्रमात या पुस्तकांचा समावेश केला. ३ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

प्राचार्या प्रीती पाेहेकर या बीड येथील स्वा. सावरकर महाविद्यालयात कार्यरत अाहेत. सावरकर घराण्यातील स्त्रियांच्या जीवनावर आधारित “त्रिवेणी’ या कार्यक्रमाचे संहितालेखन केलेले आहे आणि हा कार्यक्रम सध्या राज्यभर गाजतो आहे. त्यांनी १४ आंतरराष्ट्रीय आणि १४ राष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये-सेमिनारमध्ये शोधनिबंध सादर केले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर १७, राज्य १४ व विभागीय स्तरावरील २५ परिषदा, चर्चासत्र, कार्यशाळेत साधन व्यक्ती म्हणून शोधनिबंध सादर केले आहेत. २७ पेक्षा अधिक अतिथी व्याख्याने दिली आहेत. त्यांची १० संदर्भ पुस्तके मराठी आणि १ इंग्रजीमध्ये प्रकाशित झाली आहेत. ती सर्व नांदेड येथील स्वारातीम विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील अभ्यासक्रमांना लागू आहेत. त्यांचे १९ शोधलेख आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. राज्य शासनाने राज्य महिला अायाेगाने दिव्यांग महिलांची वैवाहिक स्थिती संशाेधन प्रकल्पासाठी त्यांची निवड केली. त्या माध्यमातून त्यांनी अंध दिव्यंग दांपत्यांचा तीन वर्षांत तुटणारा संसार पुन्हा जुळवला.

शिक्षक, प्राध्यापकांना मदत २३ वर्षांच्या कालावधीत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीसचा पूर्ण खर्च पाेहेकर यांनी केला. २० पेक्षा अधिक दिव्यांगांना प्राध्यापक, शिक्षक, क्लार्क तसेच शिक्षण क्षेत्रात नाेकरीची संधी मिळवून देत त्यांना स्वावलंबी केले, तर १५ पेक्षा अधिकांनाही खासगी नाेकरी मिळवून दिली. पती दत्ता महाजन हे गणित विषयाचे शिक्षक अाहेत.

उत्पन्नातून केले दान मागील १४ वर्षांपासून पुस्तकांमधून व व्याख्यानातून मिळणारे मानधन हे दिव्यांगांच्या शिक्षणासाठी दान केले आहे. प्राचार्या पोहेकर यांना सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने रोल मॉडेल पुरस्कार-२०२० हा तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान केला. इतर ९ राष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाले.

बातम्या आणखी आहेत...