आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंगामी वसतिगृह:वसतिगृह चालकांचे परत   १० कोटी खात्यावर जमा; हंगामी वसतिगृहांसाठीचे पैसे गेले होते परत

बीड5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत हंगामी वसतिगृह हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील ४०३ हंगामी वसतिगृहे प्रस्तावित केली होती. यातील २६८ हंगामी वसतिगृहे प्रत्यक्षात सुरू केली होती. या वसतिगृहात २३ हजार ९३८ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. दरम्यान, हे अनुदान ज्या प्रणालीद्वारे वितरण करायचे होते त्या पीएफएमएस प्रणालीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केल्याने या हंगामी वसतिगृहांसाठी आलेले १० कोटी रुपये शिक्षण विभागाकडून शासनाला परत गेले होते.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी आंदोलन केले होते. अखेर आता हे १० कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला परत मिळाले. दोन दिवसांत पैसे वसतिगृह चालकांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...