आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:केजमध्ये 10 जुगारी पकडले; 33 हजारांचा मुद्देमाल जप्त

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज पोलिसांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पत्याच्या क्लबवर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळणाऱ्या १० जणांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, नगदी रक्कम आणि मोबाईल असा ३३ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्य रस्त्यावरील अनिल टी हाऊस बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पत्याचा क्लब सुरू असल्याची माहिती गुप्त माहिती मिळताच केज ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी कारवाई करण्याच्या सूचना सहकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार सपोनि संतोष मिसळे, फौजदार आनंद शिंदे, पोलिस नाईक दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, पोलिस नाईक शमीम पाशा यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. ११) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास छापा मारला.

यावेळी सुरेश बापु काळे (रा. क्रांती नगर), अजिम नजमोद्दीन इनामदार (रा. रोजा मोहल्ला), बाळू अर्जुन गाढवे (रा. अहिल्यादेवी नगर), दिपक काळे (रा. कानडी रोड), इरफान कश्मीर सय्यद (रा. क्रांती नगर), इसाक शेख (रा. कोकीसपीर), रामभाऊ नारायण चांदणे (रा. समर्थ नगर), रामेश्वर दत्तात्रय राऊत (रा. लोंढे गल्ली), अमीर इनामदार (रा. रोजा मोहल्ला), कलीम अहेमद सय्यद (रा. अजीजपुरा) हे १० जणांवर जुगार खेळत असताना मिळून आले.

बातम्या आणखी आहेत...